गडचिरोलीकरांसाठी मोठी खूशखबरी ! वनपट्टा मंजुरीला वेग- “प्रणोतीताई चे आश्वासन आणी बावनकुळे यांची हमी

36

गडचिरोलीकरांसाठी मोठी खूशखबरी ! वनपट्टा मंजुरीला वेग- “प्रणोतीताई चे आश्वासन आणी बावनकुळे यांची हमी

दि.

गडचिरोली:गडचिरोली शहरातील लांझेडा, इंदिरानगर, रामनगर, चनकाई नगर, गोकुळनगर, विवेकानंद नगर तसेच इतर परिसरातील वनपट्टा मिळण्याच्या दीर्घ प्रतीक्षेला लवकरच समाधान मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

नगराध्यक्ष पदासाठी भाजपाकडून उमेदवार प्रणोती सागर निंबोरकर (भांडेकर) यांनी नागरिकांना दिलासा देत आश्वासन दिले आहे की—
“शहरातील सर्व सक्षम लाभार्थ्यांची वनपट्टा यादी तयार करून ती राज्याचे महसूल मंत्री माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्याकडे पाठवण्यात येईल, जेणेकरून वनपट्टा मंजुरीची प्रक्रिया तातडीने पूर्ण होईल.”

अलीकडेच झालेल्या उद्‌घाटन प्रसंगी माननीय चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी स्वतः शहरवासीयांना दिलेले आश्वासन सर्वांसाठी दिलासादायक ठरले. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की—
“प्रणोतीताई नगराध्यक्ष झाल्यावर सर्वप्रथम वनपट्टा धारकांची संपूर्ण, प्रामाणिक यादी तयार करा आणि ती माझ्याकडे पाठवा; मी त्या यादीवर त्वरित सही करून मंजुरी देईन.”

या विधानामुळे गडचिरोली शहरातील हजारो नागरिकांच्या आशांना नवीन उभारी मिळाली आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली वनपट्टा समस्या सोडविण्यासाठी शासनस्तरावरून अशा प्रकारे सकारात्मक भूमिका घेतली जाणे हे शहराच्या विकासासाठी मोठे पाऊल ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

नागरिकांच्या मूलभूत हक्कांशी संबंधित हा निर्णय गडचिरोलीच्या प्रगतीला वेग देणारा ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.