प्रभाग क्रमांक ५ मध्ये संविधान दिनी प्रचार कार्यालयाचे उद्घाटन

32

प्रभाग क्रमांक ५ मध्ये संविधान दिनी प्रचार कार्यालयाचे उद्घाटन

गडचिरोली – वृत्तवानी न्यूज

गडचिरोली, ता.२६ : भारत देशातील लोकशाहीला जगातील सर्वांत मोठ्या लोकशाहीचे अधिष्ठान प्राप्त करून दिलेल्या आपल्या भारतीय संविधान दिनी बुधवार (ता. २६) प्रभाग क्रमांक ५ येथील भाजपच्या जनसंपर्क प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी भारतीय लोकशाहीचा भक्कम पाया करणारा भारतीय संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने झाली. उपस्थित कार्यकर्ते, नागरिक आणि युवा वर्गाने संविधानाने दिलेल्या स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेच्या मूल्यांप्रती निष्ठा व्यक्त केली. याप्रसंगी गडचिरोली नगर परीषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या भाजपच्या अधिकृत उमेदवार अॅड. प्रणोती सागर निंबोरकर (भांडेकर) , माजी खासदार डॉ .अशोक नेते, माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, माजी जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, सीमा कन्नमवार, प्रकाश निकुरे यांनी उपस्थितांना संविधानाचे महत्व सांगितत सविस्तर मार्गदर्शन केले. भारतीय संविधान आपल्या राष्ट्राचा प्राण आहे. लोकशाहीला दिशा देणारे आणि प्रत्येक नागरिकाचे हक्क सुरक्षित करणारे हे संविधान जगासाठी प्रेरणादायी ठरले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसह संविधान रचनेतील सर्व महामानवांचे आपण सदैव ऋणी आहोत, असे मान्यवर म्हणाले. प्रभागातील नागरिकांनीही संविधान दिनाचे महत्त्व अधोरेखित करत भारताच्या प्रगत, न्याय्य आणि समताधिष्ठित भविष्यासाठी कार्यरत राहण्याची प्रतिज्ञा केली. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व भारतीय बांधवांना संविधानदिनाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या. या कार्यक्रमात माजी खासदार डॉ .अशोक नेते , माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी, माजी जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार अॅड. प्रणोती निंबोरकर, सीमा कन्नमवार, प्रकाश निकुरे, रमेश भुरसे, प्रमोद पिपरे, अतुल मल्लेलवार, चंदा कोडवते यांच्यासह वाॅर्डातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.

—————————