*रेतीघाटांच्या प्रारुप अहवालावर सूचना-आक्षेप आमंत्रित*

84

*रेतीघाटांच्या प्रारुप अहवालावर सूचना-आक्षेप आमंत्रित*

गडचिरोली दि. २७: (जिमाका) : शासनाच्या वाळू/रेती धोरण व मार्गदर्शक सूचनेनुसार गडचिरोली जिल्ह्यातील रेतीघाटांचे सर्वेक्षण करण्यात आले समितीने योग्य ठरविलेल्या रेतीघाटांचा प्रारुप जिल्हा सर्वेक्षण अहवाल नागरिकांच्या अवलोकनार्थ www.gadchiroli.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला आहे. या अनुषंगाने, सर्व संबंधितांनी आपले अभिप्राय, सूचना, आक्षेप, तक्रारी किंवा निवेदन जिल्हा वाळू संनियंत्रण समिती, खनिकर्म शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली यांच्याकडे ३० दिवसात लेखी स्वरूपात सादर करावेत. हे अभिप्राय mininggad@gmail.com या ईमेल पत्त्यावर देखील पाठवता येतील, असे जिल्हा खनिकर्म अधिकारी डॉ. इम्रान शेख यांनी कळविले आहे.