माझा संकल्प – माझं वचन

39

🌟 माझा संकल्प – माझं वचन

 

प्रणोती सागर निंबोरकर यांचे गडचिरोलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी -विकासाचा नवा संकल्प

 

शहर विकासाचे भक्कम आश्वासन — जनतेत उत्साहाची नवी लाट

 

गडचिरोली शहराचा सर्वांगीण कायापालट घडवण्याचा दृढनिश्चय व्यक्त करत प्रणोती सागर निंबोरकर यांनी आज मांडलेला व्यापक विकास आराखडा शहरात आशावादाची नवी उर्जा निर्माण करणारा ठरत आहे.

सुबक नियोजन, पारदर्शक प्रशासन आणि सर्वांचा समान सहभाग या त्रिसूत्रीवर आधारित त्यांचा आराखडा — केवळ घोषणांचा संच नसून ठोस कृतीची खात्री असल्याचे नागरिकांना प्रकर्षाने जाणवले.

 

त्यांच्या वचनातून शहराला भिडलेली समस्यांची अचूक जाणीव, त्यावरचे वास्तववादी उपाय आणि भविष्यातील विकासदृष्टी स्पष्टपणे उमटली. त्यामुळे नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून सामाजिक माध्यमांवरही या संकल्पनांचे मोठ्या प्रमाणावर स्वागत होत आहे.

 

प्रणोती ताई म्हणाल्या—

“विकास म्हणजे फक्त इमारती नव्हे… तर लोकांचे जीवनमान उंचावणे.

हा माझा संकल्प म्हणजे सुरक्षित, सक्षम, अभिमानास्पद आणि सर्वसमावेशक गडचिरोली घडवण्याचे वचन आहे.”

 

 

✨ गडचिरोलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी — विकासाचा नवा संकल्प!

 

4️⃣ शहरातील वाढत्या अपघातांवर कडक उपाय

 

• सुरक्षित वाहतूक व्यवस्थापन

• ब्लॅक स्पॉट्सचे पुनरुज्जीवन

• अत्याधुनिक ट्रॅफिक सिग्नल, सीसीटीव्ही, ट्रॅफिक वॉर्डन तैनाती

 

5️⃣ सर्व प्रभागात उत्कृष्ट आरोग्य सुविधा

 

• तात्काळ, मोफत व सुलभ उपचार

• आधुनिक उपकरणांसह लाइफ-सेव्हिंग रुग्णवाहिका

• “गडचिरोली हेल्थ कार्ड योजना” — रक्त, औषधे व सेवांचा पूर्ण मोफत पुरवठा

 

6️⃣ रक्ताच्या टंचाईवर कायमस्वरूपी उपाय

 

• स्थायी रक्तपेढी

• डिजिटल ब्लड-डोनेशन नेटवर्क

• तात्काळ रक्त उपलब्धतेची हमी

 

7️⃣ सर्व वॉर्डात डिजिटल सार्वजनिक वाचनालय

 

• विद्यार्थी व स्पर्धा परीक्षार्थींसाठी आधुनिक सुविधा

• ई-लायब्ररी, हाय-स्पीड इंटरनेट, डिजिटल स्टडी स्पेस

 

8️⃣ फुटपाथ दुकानदारांसाठी सन्मान बाजारपेठ

 

• सुरक्षित, स्वच्छ, अधिकृत आणि छतासह बाजारपेठ

• पावसाळ्यातही व्यवसाय निर्विघ्न

• लघु व्यावसायिकांच्या उत्पन्नवाढीस गती

 

🔟 महिला व महिला बचत गट स्वावलंबन मिशन

 

• शिवणकाम, फूड-प्रोसेसिंग, हस्तकला व ऑनलाइन व्यवसाय प्रशिक्षण

• कर्जसहाय्य, बाजारपेठ उपलब्धता

• “नारी शक्ती – आत्मनिर्भर गडचिरोली” अभियान

 

1️⃣1️⃣ युवकांना रोजगार व स्टार्टअप संधी

 

• “Start-up Gadchiroli” – तरुण उद्योजकांसाठी विशेष प्रोत्साहन

• IT, डिजिटल, ई-कॉमर्स कौशल्य प्रशिक्षण

• नवीन प्रकल्पांमध्ये युवकांना प्राधान्य

 

1️⃣2️⃣ “Smart Gadchiroli Infra Mission” — आधुनिक पायाभूत सुविधांचा संकल्प

 

• रस्ते, नाली, ड्रेनेज, स्ट्रीटलाईट यांचे संपूर्ण आधुनिकीकरण

• नवीन वॉकिंग ट्रॅक, ओपन जिम, उद्याने, बसथांबे

• पाणीपुरवठा, स्वच्छता, सांडपाणी शोधन — अत्याधुनिक तंत्रज्ञान

 

1️⃣3️⃣ सर्वांगीण, संतुलित आणि अभिनव विकास

 

• प्रत्येक गल्लीत रस्ते, नाली, पाणी, स्वच्छता

• हिरवीगार उद्याने, आकर्षक चौक

• सुजलाम-सुफलाम व सुरक्षित शहर

 

 

🌊 हर घर जल — स्वच्छ पिण्याचे पाणी

 

🌿 ओपन स्पेस संरक्षण व सुशोभीकरण

 

🏋️‍♂️ वॉर्डनिहाय जिम व वाचनालय निर्मिती

 

🌲 लांझेडा, इंदिरानगर,रामनगर चंनकाई नगर, विवेकानंद नगर गोकुळनगर तसेच इतर परिसरातील नागरिकांसाठी वनपट्टा मीळनार

 

🏠 उर्वरित घरकुल योजना पूर्णत्वास

 

🛠️ खंडित गटार योजनेचे काम पूर्ण

 

🏞️ गोकुळनगर तलाव सौंदर्यीकरण — जलद गतीने

 

🚛 जड वाहतूक वळवण्यासाठी बायपास रस्ता प्राधान्याने

 

🚶 स्वातंत्र्य पादचारी मार्ग प्रकल्प

 

• विज्ञान महाविद्यालय–चामोर्शी रोड–सेमाना देवस्थान

• धानोरा रोड–चांदाळा रोड–MUZ

• ITI चौक–LIC चौक–कलेक्टर ऑफिस (MUZ)

 

🌳 उद्यान व मनोरंजन सुविधा

 

• नाना-नानी पार्क

• चिल्ड्रेन पार्क

• तलावात बोटिंग सुविधा

 

🛍️ हॉकर्स झोनची निर्मिती

 

• स्वच्छ, सुरक्षित आणि अधिकृत व्यापारी जागा

 

🎓 आधुनिक शाळा — गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा संकल्प

 

🍖 स्वातंत्र्य मटन मार्केट

 

• स्वच्छ, सुंदर व नियोजनबद्ध बाजार संरचना

 

⭐ प्रणोती सागर निंबोरकर — जनतेला दिलेला विश्वासाचा संदेश

 

“जर तुम्ही मला नगर परिषद अध्यक्षपदाची संधी दिलीत…

तर तुमचा विश्वास सार्थ ठरवून दाखवेन.

गडचिरोलीचा बदल, सुरक्षितता, विकास आणि सन्मान — हेच माझं ध्येय आहे.”

 

शहराच्या सर्वांगीण विकासाला दिशा देणारा हा संकल्प —

गडचिरोलीच्या भविष्याला नवी उमेद, नवा आत्मविश्वास आणि नवी ऊर्जा देणारा आहे.