*जनतेचा भ्रमनिरास करणाऱ्या महायुतीला धडा शिकवा;*- आमदार विजय वडेट्टीवार

393

*जनतेचा भ्रमनिरास करणाऱ्या महायुतीला धडा शिकवा;*- आमदार विजय वडेट्टीवार

 

*काँग्रेसची गडचिरोलीत नगर परिषद निवडणूक सभा*

 

गडचिरोली :: गडचिरोली येथे गडचिरोली नगर परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार कविताताई पोरेट्टीवार आणि नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ काँग्रेसची जाहीर सभा पार पडली.

 

देशातील शेतकरी, शेतमजूर, कामगार, कर्मचारी सर्व सामान्य नागरिक यांना महागाईच्या खाईत लोटून महाराष्ट्र राज्याची गुजरात चरणी अस्मिता गहाण ठेवणाऱ्या महायुती सरकारने राज्यातील जनतेचा भ्रमनिरास केला असून. या लुटारू सरकारला येणाऱ्या निवडणुकीत धडा शिकवा असे आवाहन काँग्रेस विधिमंडळ गटनेते तथा आमदार विजय वडेट्टीवार यांनी केले.

 

गडचिरोली जिल्ह्यात सत्ताधाऱ्यांकडून खनिज संपत्तीची लूट सुरू आहे. तर दुसरीकडे स्थानिक बेरोजगारांना रोजगारापासून दूर करण्याचे पाप हे निष्ठुर सरकार करत आहे. मागील 5 वर्षाच्या काळात नियोजनाअभावी सत्ताधारी भाजपने गडचिरोली नगरपरिषदेची पूर्णतः वाट लावली. विकासकामांच्या कंत्राटातून कोट्यावधींचा भ्रष्टाचार केला. सर्वसामान्यांच्या जीवावर उठलेल्या या हेकेखोर व डल्लेबाज सरकारला जागा दाखवण्याचे आवाहनहीं त्यांनी यावेळी उपस्थिताना केले.

 

या प्रचार सभेस नगर परिषद निवडणूक गडचिरोली जिल्हा प्रभारी संदेश सिंगलकर, जिल्हाध्यक्ष महेन्द्र ब्राम्हणवाडे, माजी नगराध्यक्ष सुरेशजी पोरेड्डीवार, ॲड. राम मेश्राम, मनोहरजी पोरेटी, सतीश विधाते, प्रभाकर वासेकर, महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष कविता मोहरकर, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार कविताताई पोरेड्डीवार, यांचेसह नगरसेवक पदाकरिता उभे असलेले सर्व उमेदवार, गडचिरोली जिल्हा काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.