*_सुप्रसिद्ध अभिनेत्री अंकिता लोखंडे (पवित्र रिश्ता फेम )यांच्या भव्य रोड-शोला गडचिरोलीत उत्स्फूर्त प्रतिसाद…_*

167

*_सुप्रसिद्ध अभिनेत्री अंकिता लोखंडे (पवित्र रिश्ता फेम )यांच्या भव्य रोड-शोला गडचिरोलीत उत्स्फूर्त प्रतिसाद…_*

—————————————-

गडचिरोली नगरपरिषद निवडणूक–२०२५ : भाजपा नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार अॅड. प्रणोती सागर निंबोरकर (भांडेकर) यांच्यासह सर्व नगरसेवक उमेदवारांच्या प्रचाराला गडचिरोलीत जोरदार प्रचाराचा प्रतिसाद…

 

*मा.खा.डॉ. अशोकजी नेते यांचाही रोड-शो ला उत्स्फूर्तीने सहभाग*

 

गडचिरोली | दि. २९ नोव्हेंबर २०२५

 

गडचिरोली नगरपरिषद निवडणूक–२०२५ च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीतर्फे आयोजित भव्य रोड-शोला शहरातील भाजपा कार्यालय पासून गांधी चौक,सराफा लाईन बाजार रोड,हनुमान मंदिर तेल्ली मोहल्ला, वंजारी मोहल्ला, धानोरा मेन रोड,काँम्प एरिया, रामनगर,रेड्डी गोडाऊन चौक ते चामोर्शी रोड वरील भाजपा कार्यालय पर्यत रोड-शो ला नागरिकांकडून अक्षरशः प्रचंड प्रतिसाद मिळाला. ‘पवित्र रिश्ता’ फेम, मुंबईतील सुप्रसिद्ध अभिनेत्री अंकिता लोखंडे यांच्या आगमनाने या रोड-शोला वेगळेच आकर्षण प्राप्त झाले. रस्त्यांच्या दुतर्फा उभ्या असलेल्या नागरिकांनी जल्लोषात स्वागत करत उत्साहाचे वातावरण अधिक रंगत आणले.

 

भाजपा नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार अॅड. प्रणोती सागर निंबोरकर (भांडेकर) तसेच सर्व नगरसेवक उमेदवारांच्या प्रचारार्थ हा रोड-शो भव्यतेने पार पडला. शहराच्या विविध मार्गांवरून निघालेला शो दमदार पद्धतीने पूर्ण झाला.

 

या प्रसंगी भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री तथा माजी खासदार डॉ. अशोकजी नेते यांनी स्वतः उपस्थित राहून रोड-शोमध्ये सहभागी होत उमेदवारांना उत्साहाचा नवा भरारा दिला.

 

रोड-शो दरम्यान आमदार डॉ. मिलिंद नरोटे,जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे,निवडणूक प्रमुख व माजी जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे,

माजी आमदार डॉ. देवरावजी होळी,माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी,ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष बाबुराव कोहळे,महिला मोर्चा प्रदेश सचिव रेखाताई डोळस,महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा योगिता पिपरे, जिल्हा महामंत्री गोविंद सारडा, प्रकाश गेडाम, सदानंद कुथे,डॉ. भारत खटी, जेष्ठ नेते सुधाकर येंगदलवार यांच्यासह मोठ्या संख्येने भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

 

गडचिरोलीतील नागरिकांनी दाखवलेल्या या उत्साहपूर्ण प्रतिसादाने निवडणूक प्रचाराला नवे जोरदार वळण मिळाले असून, शहराच्या विकासासाठी भाजपाच्या आश्वासनांना जनतेचा वाढता प्रतिसाद दिसून आला.