*राष्ट्रीय किटकजन्य आजार नियंत्रण कार्यक्रम: गडचिरोली येथे राज्यस्तरीय आढावा बैठक संपन्न*
*डॉ. अभय बंग संचालक व संस्थापक, SEARCH, गडचिरोली, यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण चर्चासत्र; हिवताप मुक्ती अभियानाचा आढावा*
गडचिरोली: ३० नोव्हेंबर २०२५ – महाराष्ट्र राज्यातील किटकजन्य आजारांवर (Vector Borne Diseases) प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी व प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी डॉ निपुण विनायक सचिव सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या संकल्पनेतून दिनांक २९ व ३० नोव्हेंबर २०२५ रोजी गडचिरोली येथील SEARCH (सोसायटी फॉर एज्युकेशन, ॲक्शन ॲन्ड रिसर्च इन कम्युनिटी हेल्थ) फाउंडेशन येथे दोन दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळा/आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. सहसंचालक, आरोग्य सेवा (हिवताप, हत्तीरोग व जलजन्य रोग), पुणे यांच्या वतीने या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
डॉ. अभय बंग, संचालक व संस्थापक, SEARCH, गडचिरोली, यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. डॉ. बंग यांनी उपस्थितांना किटकजन्य आजार नियंत्रणाच्या सामुदायिक मॉडेलवर आधारित बहुमोल मार्गदर्शन केले, ज्यामुळे हा कार्यक्रम अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी नवी दिशा मिळणार आहे.
या बैठकीचे आयोजन CHRI-PATH आणि GCPL CSR यांच्या संयुक्त सहकार्याने करण्यात आले होते. तसेच बैठकीला.डॉ शशिकांत शंभरकर उप संचालक नागपूर, श्रीम नैना धुपारे सहायक संचालक हिवताप नागपूर, डॉ महेंद्र जगताप राज्य कीटकशास्त्रज्ञ उपस्थित होते.
बैठकीचे स्वरूप आणि प्रमुख चर्चा
*उद्घाटन व प्रमुख मार्गदर्शन:*
दि. २९ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
मुख्य कार्यकारी अधिकारी श्री सुहास गाडे यांनी सर्व विभागानी समन्वयाने काम केले तर हिवताप दुरीकरण नक्कीच होऊ शकते असे त्यांनी सांगितले
*गडचिरोली हिवताप मुक्ती अभियान:*
या बैठकीचा मुख्य केंद्रबिंदू गडचिरोली जिल्ह्यातील हिवताप (Malaria) नियंत्रणाचा कार्यक्रम होता. डॉ. प्रताप शिंदे, जिल्हा आरोग्य अधिकारी (DHO), गडचिरोली, यांनी *’गडचिरोली हिवताप मुक्त अभियान योजने’* वर सविस्तर सादरीकरण केले, डॉ. सुजिता वाडीवे, जिल्हा हिवताप अधिकारी (DMO), गडचिरोली, यांनी अंमलबजावणीतील कार्यक्रम आणि अद्ययावत माहिती सादर केली.
*तज्ज्ञांचे संवादसत्र:*
अध्यक्ष डॉ. अभय बंग यांनी ‘हिवताप नियंत्रण उपायांवर’ उपस्थितांशी विस्तृत संवाद साधला. तसेच डॉ. अचिंत्य श्रीवास्ता, वरिष्ठ कार्यक्रम अधिकारी, संसर्गजन्य रोग, PATH, डॉ अमित गंभीर राज्य समन्व्यक PATHयांनीही तांत्रिक सादरीकरण केले.
दिवसभर सखोल चर्चा झाल्यानंतर डॉ. संदीप सांगळे यांनी राज्याच्या किटकजन्य आजार नियंत्रण बद्दल मार्गदर्शन केले.
*उपस्थित मान्यवर*
या कार्यशाळेला राज्याच्या सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील महत्त्वाचे अधिकारी, तज्ज्ञ आणि जिल्हा हिवताप अधिकारी उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने डॉ. कादंबरी बलकवडे (भा.प्र.से.) (आयुक्त, आरोग्य सेवा तथा अभियान संचालक, NHM, दूरभाष्य प्रणालीद्वारे), गडचिरोलीचे श्री. सुहास गाडे (मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद) डॉ शशिकांत शंभरकर उपसंचालक, यांचा समावेश होता. यासोबतच, डॉ. संदीप सांगळे (सहसंचालक, किटकजन्य रोग नियंत्रण, पुणे), अध्यक्ष डॉ. अभय बंग (संचालक व संस्थापक, SEARCH, गडचिरोली), डॉ. अंचिंत्य श्रीवास्ता (वरिष्ठ कार्यक्रम अधिकारी, PATH), डॉ अमित गंभीर राज्य समन्व्यक CHRI,डॉ. प्रताप शिंदे (जिल्हा आरोग्य अधिकारी, गडचिरोली),डॉ माधुरी किलनाके जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुजिता वाडीवे (जिल्हा हिवताप अधिकारी, गडचिरोली) आणि डॉ. प्रेमचंद कांबळे (सहाय्यक संचालक, हत्तीरोग) श्री राहुल राठोड राज्य M&E हे मान्यवर उपस्थित होते. तसेच, राज्याच्या विविध जिल्ह्यातील सर्व जिल्हा हिवताप अधिकारी आणि सहाय्यक संचालक हिवताप यांनी सक्रिय सहभाग घेतला.
*क्षेत्र भेटीद्वारे कामाची माहिती*
या बैठकीच्या दुसऱ्या दिवशी दिनांक ३० नोव्हेंबर २०२५ रोजी गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागातील आरोग्य कार्यक्रमांच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीची पाहणी करण्यासाठी आणि ग्राम स्तरावरच्या कामाची माहिती घेण्यासाठी विस्तृत क्षेत्र भेट आयोजित करण्यात आली होती. या दौऱ्यात आरोग्य पथकांनी सर्वप्रथम प्राथमिक आरोग्य केंद्र कारवाफा, त्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्र गोडलवाही आणि उपकेंद्र कोंदावाही या ठिकाणी भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी जिल्ह्यामध्ये राबविण्यात येत असलेल्या हिवताप विषयक कामकाज आणि इतर सर्व राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांची अंमलबजावणी नेमकी कशी चालते हे जाणून घेतले. मान्यवरांनी आरोग्य सुविधा, नोंदी आणि कर्मचाऱ्यांच्या कामाची माहिती घेतली.
(डॉ. प्रताप शिंदे)
जिल्हा आरोग्य अधिकारी
जिल्हा परिषद, गडचिरोली




