नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक – 2025 च्या अनुषंगाने बंदोबस्तासाठी गडचिरोली पोलीस दल सज्ज

173

 

नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक – 2025 च्या अनुषंगाने बंदोबस्तासाठी गडचिरोली पोलीस दल सज्ज

 

* बंदोबस्तासाठी 68 अधिकारी, 758 पोलीस अंमलदार व 250 होमगार्ड असे एकूण 1076 मनुष्यबळ सज्ज

* एकूण 33 प्रभागातील 105 मतदान केंद्रांवर होणा­या मतदानासाठी बंदोबस्त तैनात

* तीनही नगर परिषद हद्दीत अत्याधूनिक ड्रोनद्वारे ठेवली जाणार करडी नजर

 

 

 

नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या अनुषंगाने गडचिरोली जिल्ह्रात गडचिरोली, देसाइगंज (वडसा) व आरमोरी या तिनही नगर परिषदांकरीता उद्या दिनांक 02 डिसेंबर 2025 रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे व दिनांक 03 डिसेंबर 2025 रोजी मतमोजणी होणार आहे. सकाळी 08/00 ते संध्याकाळी 05/00 वा. पर्यंत मतदान प्रक्रिया सुरु राहणार असून या अनुषंगाने पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री. नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक सुरळीतपणे पार पाडण्यासाठी गडचिरोली पोलीस दल सज्ज झाले आहे.

 

गडचिरोली, आरमोरी व देसाईगंज (वडसा) या तीनही ठिकाणी एकूण 105 मतदान केंद्रांवर मतदान होणार असून, मतदान आणि मतमोजणी शांततेत पार पडून कोणताही अनूचित प्रकार घडू नये यासाठी गडचिरोली पोलीस दलाकडून चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यामध्ये पोस्टे गडचिरोली येथे एकूण 32 अधिकारी, 309 पोलीस अंमलदार व 100 होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत; पोस्टे आरमोरी येथे एकूण 15 अधिकारी, 181 पोलीस अंमलदार व 75 होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत; पोस्टे देसाईगंज (वडसा) येथे एकूण 21 अधिकारी, 268 पोलीस अंमलदार व 75 होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत. असा एकूण 1067 मनुष्यबळाचा बंदोबस्त ही निवडणूक यशस्वीपणे पार पाडण्यासाठी तैनात करण्यात आला आहे. यामध्ये गडचिरोली जिल्हा पोलीस दलासोबतच 02 आरसीपी पथक व 01 एसआरपीएफची कंपनी तैनात करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री. नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक सुरळीत पार पडण्यासाठी मतदान केंद्रांवरील बंदोबस्तासोबतच प्रत्येक 04 बुथसाठी एका अधिका­याचा समावेश असलेले विशेष पथक तैनात करण्यात आले आहे. तसेच प्रत्येक पोलीस स्टेशन हद्दीत कमीत कमी 05 चार्ली पेट्रोलींग वाहने तैनात केली जाणार असून प्रत्येक नगर परिषदेच्या सिमावर्ती भागात नाकाबंदी तैनात करुन करडी नजर ठेवली जाणार आहे. यासोबतच जिल्ह्रातील सर्व मतदान केंद्रावर आकाशमार्गाने देखील सुक्ष्म पाहणी करण्यासाठी 03 अत्याधूनिक ड्रोनची मदत घेतली जाणार आहे.

 

सदर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक – 2025 च्या अनुषंगाने निवडणूक प्रक्रिया ही शांततापूर्ण वातावरणात निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी संपूर्ण गडचिरोली पोलीस दल, राज्य राखीव पोलीस बल, गृह रक्षक दल हे पोलीस अधीक्षक, गडचिरोली श्री. नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. गोकुल राज जी., यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस अधीक्षक धानोरा श्री. अनिकेत हिरडे, उपविभागीय पोलीस अधिकारी, गडचिरोली श्री. सुरज जगताप व उपविभागीय पोलीस अधिकारी, कुरखेडा श्री. रविंद्र भोसले यांच्या नेतृत्वात सज्ज आहेत. यावेळी पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री. नीलोत्पल यांनी जिल्ह्रातील नागरिकांना भयमुक्त वातावरणामध्ये पुढे येऊन सर्वांनी जास्तीत जास्त मतदान करण्याचे आवाहन केले आहे.

 

।।।।।।।।।।।।।।।।