भाकपाच्या आंदोलनांना मोठे यश; एटापल्ली तालुक्यातील १६ दुर्गम भागातील रस्ते होणार

49

भाकपाच्या आंदोलनांना मोठे यश; एटापल्ली तालुक्यातील १६ दुर्गम भागातील रस्ते होणार

जिल्हा खनिकर्म निधीतून (DMF) कामांना मिळणार गती; रुग्ण, विद्यार्थी, महिलांचे दळणवळणाचे प्रश्न सुटणार
एटापल्ली/गडचिरोली, (दैनिक वृत्तसेवा):
भारतीय कम्युनिस्ट पार्टी (भाकपा) चे जिल्हा सहसचिव सचिन मोतकुरवार यांनी जनतेच्या वतीने विविध जनआंदोलने आणि प्रशासकीय स्तरावर केलेल्या पाठपुराव्याला अखेर मोठे यश मिळाले आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या एटापल्ली तालुक्यातील १६ महत्त्वपूर्ण रस्त्यांच्या कामांना आता गती मिळणार आहे. या रस्त्यांसाठी जिल्हा खनिकर्म निधी (DMF) अंतर्गत तब्बल ₹१६२ कोटी ५६ लाख हून अधिक निधी प्रस्तावित करण्यात आला आहे.
प्रशासनाकडून लेखी माहिती प्राप्त
उपविभागीय अभियंता, सार्वजनिक बांधकाम उपविभाग, यांच्या कार्यालयाने दिनांक २८ नोव्हेंबर २०२५ रोजी भाकपाचे जिल्हा सहसचिव सचिन मोतकुरवार यांना लेखी पत्र देऊन या कार्यवाहीची माहिती दिली आहे. या पत्रानुसार (जावक क्र. ८३६/तां./२०२५), मोतकुरवार यांनी मागणी केलेल्या रस्ता बांधकामाचे अंदाजपत्रक प्रशासकीय मान्यतेच्या (प्र.मा.) पुढील कार्यवाहीसाठी वरिष्ठ कार्यालयाकडे यापूर्वीच सादर करण्यात आले आहे. सदर कामांना प्रशासकीय मान्यता मिळताच पुढील कार्यवाही तातडीने सुरू केली जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
जिल्हा खनिकर्म निधीतून निधी उपलब्ध
भाकपाच्या सातत्यपूर्ण मागणीनुसार, सार्वजनिक बांधकाम मंडळाने १५ नोव्हेंबर २०२५ रोजी या १६ रस्त्यांसाठी अंदाजित ₹१६२५६.५७ लक्ष (सुमारे ₹१६२.५६ कोटी) खर्चाचे प्राथमिक अंदाजपत्रक नागपूर येथील मुख्य अभियंत्यांकडे सादर केले आहे. हा निधी खनिकर्म क्षेत्रातील स्थानिक विकासासाठी राखीव असलेल्या DMF (जिल्हा खनिकर्म निधी) मधून उपलब्ध होणार आहे.
मंजुरीसाठी सादर केलेले महत्त्वाचे १६ रस्ते:
भाकपाच्या संघर्षामुळे प्रशासकीय मान्यतेसाठी सादर झालेल्या यादीत खालील रस्त्यांचा समावेश आहे. या रस्त्यांची बांधकामे लवकरच मार्गी लागण्याची शक्यता आहे:
| क्र. | रस्त्याचे नाव | अंदाजित खर्च (लक्ष रुपयांत) |
|—|—|—|
| १ | Reknar to Gundapuri | ₹१७७३.८० |
| २ | Jambiya to Modaske (VR-८५) | ₹११३२.९० |
| ३ | Parsalgondi to Reknar (ODR-२३) | ₹१११२.४० |
| ४ | Bhadbhidi Ghot… ते Gatta/State Boarder पर्यंतचे तीन टप्पे | ₹३३०६.४० (एकत्रित) |
| ५ | Gundapuri to Fundi (VR-१५५) | ₹८६५.७० |
| ६ | Alenga to Halur | ₹७८९.९० |
| ७ | Petha to Karmapalli (Nan Plan) | ₹७६६.६० |
| ८ | Pursalgondi to Surjagad | ₹६९५.३० |
| ९ | Talodhi Aamgaon Dewari… (SH-३८१ चा टप्पा) | ₹६८८.३० |
| १० | Adange to Phuske (VR-८७) | ₹६०६.५० |
| ११ | Itulanar to Pursagondi | ₹४६४.०० |
| १२ | Yedasgondi to Zarewada (ODR-२३) | ₹४४३.४० |
| १३ | Alenga to Alenga tola (V.R.१२४) | ₹३५४.१० |
| १४ | Markal tola to Burgi (Kandoli) | ₹२६६.२७ |
जनतेला मोठा दिलासा
या रस्त्यांची बांधकामे पूर्ण झाल्यास एटापल्ली तालुक्यातील दळणवळणाची समस्या कायमस्वरूपी सुटणार आहे. ज्यामुळे रुग्ण, ॲम्बुलन्स सेवा, शालेय विद्यार्थी, महिला आणि सर्वसामान्य प्रवाशांच्या जीवनातील अडचणी दूर होणार आहेत. भाकपाने विविध जनआंदोलनांतून जनतेचा हक्क मिळवून दिला असून, या कामांना लवकरात लवकर प्रशासकीय मान्यता मिळणार आहे ,नागरिक समाधान व्यक्त करत आहेत.
कॉ. सचिन मोतकुरवार यांनी जनतेच्या सेवेत राहण्याची कटिबद्धता पुन्हा एकदा सिद्ध केली आहे.