आरोग्य सेविकेचा विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न, तालुका वैद्यकीय अधिकाऱ्या विरोधात गुन्हा नोंद

116

आरोग्य सेविकेचा विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न, तालुका वैद्यकीय अधिकाऱ्या विरोधात गुन्हा नोंद

मुलचेरा (दि. ९ डिसेंबर) मुलचेरा येथील कंत्राटी आरोग्य सेविका (C-ANM) यांनी दि. ६ डिसेंबर २०२५ रोजी त्यांचे राहते घरी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्यामुळे, त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे आंतर रुग्ण म्हणुन भरती करण्यात आले होते. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विनोद म्हशाखेत्री, वय- ५० यांनी कंत्राटी महिला आरोग्य सेविका यांना वेतनामध्ये वाढ करून देतो या आमिषाने मागील दोन वर्षापासून वारंवार शारीरिक सुखाची मागणी केली होती व मानसिक त्रास दिला होता.

 

यामुळे कंत्राटी महिला आरोग्य सेविका यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला, यावरून पो. स्टे. गडचिरोली येथे आज दि. ८ डिसेंबर २०२५ रोजी Zero FIR दाखल करण्यात आली असून भारतीय न्याय संहिता कलम ७५(२),७८ (२) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

 

सदर कंत्राटी महिला आरोग्य सेविका यांची प्रकृती सध्या स्थिर असून पोस्टे मुलचेरा पोलीस या गुन्ह्याचा पुढील तपास करीत आहेत