नवनिर्मित महिला रुग्णालय अहेरी येथे हृदयरोग आजाराच्या बालकांसाठी  २डी-ईको तपासणी शिबीर संपन्न

44

नवनिर्मित महिला रुग्णालय अहेरी येथे हृदयरोग आजाराच्या बालकांसाठी

२डी-ईको तपासणी शिबीर संपन्न

 

 

गडचिरोली, (जिमाका) दि.08 डिसेंबर: नुकतेच मा.मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्याचे पालकमंत्री यांच्या शुभ हस्ते अहेरी येथील नवनिर्मित महिला रुग्णालयाचे उद्घाटन झाले असून या महिला रुग्णालय अहेरी येथे दि.०३/१२/२०१५ रोजी सकाळी ११ ते ०४ वा. ० ते १८ वर्षे वयोगटातील संशयित हृदयरोग असणारे बालके/विध्यार्थी यांच्या हृदयरोगाच्या निदान निश्चिती करिता २डी-ईको तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हातील आरबीएसके-डीईआयसी कार्यक्रमाद्वारे ० ते १८ वर्षे वयोगटातील बालके/विध्यार्थी यांच्या सर्वसमावेशक प्राथमिक आरोग्य तपासणी करून जन्मता आजार असणारी बालके शोधली जातात. या बालकांच्या पुढील उच्चस्तरीय तपासणी/उपचार, निदान निश्चिती, विशेष चाचण्या, उच्च स्तरीय विशेषज्ञ सल्ला/सेवा, शस्त्रक्रिया इत्यादीकरिता “द्वितीयस्तरीय संदर्भसेवा कक्ष” म्हणून “जिल्हा शीघ्र हस्तक्षेप केंद्र” (डीईआयसी), जिल्हा महिला व बाल रुग्णालय गडचिरोली येथे स्थापित असून गरजेनुसार द्वितीयस्तरीय तथा तृतीयस्तरिय आरोग्य सेवा प्रदान करण्यात येते.

सदर डीईआयसी मार्फत दरवर्षी नियमितपणे संशयित हृदयरोग असणारे बालके/विध्यार्थी यांच्या हृदयरोगाच्या निदान निश्चिती करिता मोफत २डी-ईको तपासणी शिबिराचे आयोजन जिल्हास्तरावर डीईआयसी बालविभाग, जिल्हा महिला व बाल रुग्णालय गडचिरोली येथे करण्यात येते परंतु पहिल्यांदाच तालुक्याच्या ठिकाणी नुकतेच उद्घाटन झालेले नवनिर्मित महिला रुग्णालय येथे सदर शिबिराचे आयोजन करण्यात आले. यामुळे एटापल्ली, भामरागड, मुलचेरा, अहेरी, सिरोंचा येथील बालकांच्या पालकांना जवळ असल्याने येण-जाणं सोयीचे झाले.

शिबिरामध्ये २डी-ईको तपासणी करिता अपोलो रुग्णालय मुंबई येथील प्रसिद्ध विशेषज्ञ डॉ.भूषण चव्हाण बाल हृदयरोगतज्ञ व चमू उपस्थित झाली. यामध्ये एकूण ३७ बालके/विध्यार्थी यांची २डी-ईको तपासणी केली असून ११ बालकांना शस्त्रक्रियेची गरज आहे व काही बालकांचा पुन्हा पाठपुरावा लागणार आहे तसेच निदान निश्चिती झालेल्या बालकांच्या पालकांना याबाबत संपूर्ण समुपदेशन करण्यात आले. राज्यस्तरीय मार्गदर्शक सुचनेनुसार पात्र बालकांना तृतीय स्तरीय संदर्भसेवे करिता डीईआयसी कडून व्यवस्थापन होणार आहे.

शिबिराकरिता डॉ.माधुरी किलनाके जिल्हा शल्य चिकित्सक, डॉ सतीशकुमार साळुंखे अति.जिल्हा शल्य चिकित्सक, यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. तथा डॉ. बागराज धुर्वे बाह्य संपर्क अधिकारी, डॉ.प्रफुल हुलके जिल्हा मात व बाल संगोपन अधिकारी, डॉ.प्रशांत पेंदाम वैद्यकीय अधीक्षक जिल्हा महिला व बाल रुग्णालय, डॉ.कन्ना मडावी वैद्यकीय अधीक्षक अहेरी यांच्या नियोजनामध्ये राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम(आरबीएसके) सामान्य रुग्णालय गडचिरोली व जिल्हा शीघ्र हस्तक्षेप केंद्र(डीईआयसी) बालआरोग्य विभाग जिल्हा महिला व बाल रुग्णालय गडचिरोली तर्फे बालकांच्या सुद्रुड आरोग्याच्या भविष्याकरिता बालकांमधील जन्मता असणारे हृदयरोग आजार/दोष बाबत शिबिराचे आयोजन करण्यात आले.

गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात आरोग्यसेवा पुरवताना अनेक अडचणी येतात. परंतु यावर मात करणे आता शक्य मुख्य म्हणजे आपल्या बालकांबाबत संभ्रमित असणारया पालकांना तज्ञांची सेवा जिल्ह्यातच मिळाल्याने पालक आनंदी आहेत.

0000