गडचिरोली येथील तालुका आरोग्य अधिकारी डॉ विनोद मशाखेत्री तात्काळ निलंबित
गडचिरोली, दि. १० डिसेंबर, २०२५
महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने, कंत्राटी आरोग्य सेविकेने आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी डॉ. विनोद घनश्याम म्हशाखेत्री, तालुका आरोग्य अधिकारी, गडचिरोली यांना तात्काळ निलंबित करण्याचा आदेश जारी केला आहे.
* गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल झाल्यामुळे आणि याप्रकरणी विभागीय चौकशी करण्याचे नियोजित असल्याने, महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९ मधील तरतुदीनुसार त्यांना तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले आहे
* निलंबन काळात डॉ. विनोद घनश्याम म्हशाखेत्री यांचे मुख्यालय जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, गोंदिया येथे निश्चित करण्यात आले आहे.
डॉ प्रताप शिंदे
जिल्हा आरोग्य अधिकारी
जिल्हा परिषद गडचिरोली




