भाजप प्रदेश उपाध्यक्ष डॉ. देवराव होळी यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालयात फळवाटप — सामाजिक बांधिलकीचे प्रभावी दर्शन!
——————————————————————–
एटापल्ली –
भाजप प्रदेश उपाध्यक्ष डॉ. देवराव होळी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालयात आयोजित फळवाटप कार्यक्रम उत्साहात पार पडला. केवळ औपचारिकता नव्हे, तर रुग्णांच्या सेवेसाठी सामाजिक उत्तरदायित्व जपण्याचा मजबूत संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
कार्यक्रमाला भाजपच्या स्थानिक नेतृत्वाचा प्रभावी जमाव पाहायला मिळाला. नगरपंचायत नगराध्यक्षा सौ. रेखाताई मौहुर्ले, जेष्ठ नेते व नगरसेवक श्री दिपकजी सोनटक्के, जेष्ठ नेते श्री अशोकजी पुल्लुरवार, भाजप तालुका अध्यक्ष प्रसाद भाऊ पुल्लुरवार, युवानेते व माळी समाजाचे अध्यक्ष बंटी भाऊ उर्फ महेश मोहुर्ले, जिल्हा कार्यकारिणी सदस्य श्री विजय नल्लावार, नगरपंचायत बांधकाम सभापती निर्मलाताई कोंडबत्तुलवार, शहराध्यक्ष राकेशभाऊ तेलकुंटलवार , भाजप तालुका महामंत्री श्री बाबला भैय्या मुजुमदार आदी मान्यवरांची उपस्थिती कार्यक्रमाला वेगळेच वजन देऊन गेली.
रुग्णालयातील प्रत्येक रुग्णाला व्यक्तिगत भेट देत फलवाटप करण्यात आले. वाढदिवस साजरा करण्याची ही आगळीवेगळी पद्धत स्थानिकांमध्ये कौतुकाचा विषय ठरली असून ‘सेवा हीच सर्वोच्च प्रार्थना’ या भावनेला अधिक बळकटी देणारा उपक्रम म्हणून या कार्यक्रमाकडे पाहिले जात आहे.
भाजप नेतृत्वाची सामाजिक बांधिलकी, रुग्णसेवेचा संवेदनशील दृष्टिकोन आणि कार्यकर्त्यांची एकजूट — या सर्वांचा प्रभावी प्रत्यय देणारा हा कडक आणि अभिमानास्पद उपक्रम ठरला.




