नागपुरात मराशिप संघटनेचे धरणे आंदोलन १३ डिसेंबर रोजी

77

नागपुरात मराशिप संघटनेचे धरणे आंदोलन १३ डिसेंबर रोजी

चामोर्शी: महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद संघटनेच्या वतीने

नागपूर येथे सुरु असलेल्या विधीमंडळाच्या अधिवेशनासमोर यशवंत स्टेडियम येथे शनिवार दि. १३ डिसेंबर २०२५ ला दुपारी १२:०० ते सायं. ५:०० या कालावधीत प्रलंबित न्याय मागण्यांच्या पुर्ततेसाठी एक दिवसीय धरणे आंदोलन आयोजित केलेले आहे. धरणे आंदोलनातील या प्रमुख मागण्याचा समावेश आहे.

अशैक्षणिक शासन निर्णय दि. १५ मार्च २०२४ रद्द करा,टिईटी पात्रता परीक्षा अट रद्द करा

१ नोव्हेंबर २००५ पूर्वी विना अनुदानित/अंशतः अनुदानित शाळेत नियुक्त शिक्षक कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करा.

शिक्षक कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेच्या लाभापासून वंचित करणारा वित्त विभागाचा शासन निर्णय ३१ ऑक्टोबर २००५ व शिक्षण विभागाचा शासन निर्णय २९ नोव्हेंबर २०१० रद्द करा.सर्व प्रकारच्या शाळांना देय वेतन अनुदानावर आधारित वेतनेत्तर अनुदान देण्यात यावे.

राज्यातील शिक्षकांना अशैक्षणिक कामातुन मुक्त करुन फक्त अध्यापनाचे काम करु द्या. सहशालेय उपक्रमांची माहिती संगणकाद्वारे पाठविण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण करा. विद्यार्थी शिष्यवृत्ती वाढीव दराने द्या.

शिक्षकांना (१०-२०-३०) आश्वासित प्रगती योजना लागू करा.राज्यातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना वैद्यकिय कॅशलेस योजना लागु करा.

प्राथमिक/माध्यमिक शाळांना मुख्याध्यापक/लिपीक पदे मंजूर करा.चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याची पदे पुनर्स्थापित करा.

राज्यातील महिला शिक्षक कर्मचाऱ्यांना मासिक पाळी रजा देय घोषित करा. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० ची अंमलबजावणी करण्यासाठी बालवाटीका स्तरातील (वयोगट ३ ते ६) शिक्षणाला कायदेशिर शैक्षणिक दर्जा द्यावा.भ्रष्ट अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करा. या प्रमुख मागण्याचा आहेत धरणे आंदोलनाला जास्तीत जास्त संख्येने शिक्षक ,शिक्षिका , शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद नागपूर विभागीय कोषाध्यक्ष संतोष सुरावार यांनी केले आहे.