आनंददायी शनिवार उपक्रमातून विद्यार्थ्यांना संत गाडगेबाबा जीवनावर धडे   भेंडाळा विश्र्वशांती विद्यालयात पुढाकारातून

25

आनंददायी शनिवार उपक्रमातून विद्यार्थ्यांना संत गाडगेबाबा जीवनावर धडे

भेंडाळा विश्र्वशांती विद्यालयात पुढाकारातून

चामोर्शी:-

 

दिनांक 20 डिसेंबर 2025 रोज शनिवार ला विश्वशांती विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय भेंडाळा येथे आनंददायी शनिवार उपक्रम आणि संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून श्री भोपासिंग पवार उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे मुख्याध्यापक श्री अरुण राऊत, पर्यवेक्षक संतोष सुरावार, श्री प्रशांत घरत तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून ममता सातपुते उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या सुरवातीला संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली अर्पण करण्यात आली. यांनंतर शाळेतील विद्यार्थ्यांनी संत गाडगेबाबा यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाच्या मार्गदर्शिका ममता सातपुते यांनी संत गाडगेबाबा यांच्या जीवनकार्याबद्दल विस्तृत अशी माहिती विद्यार्थ्यांना दिली. कार्यक्रमाचे संचालन आणि आभार प्रदर्शन वैभव आईंचवार यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.