इंदिरा गांधी महाविद्यालय गडचिरोली येथे संत गाडगेबाबा यांची पुण्यतिथी चा कार्यक्रम साजरा
गढ़चिरोली : एकता सामाजिक शिक्षण संस्था गडचिरोली द्वारा संचालित इंदिरा गांधी महाविद्यालय गडचिरोली येथे संस्था सचिव व प्राचार्य विश्व शांतीदुत प्रकाश आर अर्जुनवार यांच्या मार्गदर्शनानुसार संत गाडगेबाबा यांची पुण्यतिथी चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमाला प्राचार्य महेश देशमुख, प्रा. राजन बोरकर, प्रा. कु. मनिषा येलमुलवार, प्रा.नलिनी लोखंडे, प्रा.विशाल भांडेकर, प्रा. हर्षल गेडाम,
प्रा.नवनीत निमसरकार, प्रा. कु. पिपरे, इत्यादि उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांनी संत गाडगेबाबांचा संघर्ष, त्यांचे जीवनकार्य, त्यांचे किर्तनातुन प्रबोधन, अंधश्रद्धेवर प्रहार व समाजसेवा याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे संचालन छात्र प्रतिनिधि संचीत कडवे व आभार छात्र प्रतिनिधि नीलेश मडावी या विद्यार्थ्यांनी मानले .
कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी वर्ग ११,१२ वी आणि बी.ए. च्या सर्व सर्व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.




