आरमोरी नगरपरिषदेवर भाजपचा विजयाचा गुलाल!
आरमोरी नगरपरिषद निवडणूक २०२५ मध्ये भारतीय जनता पक्षाने नगराध्यक्ष व २० पैकी १५ जागांवर अभूतपूर्व विजय मिळवून इतिहास रचला आहे. या देदीप्यमान विजयाचे मुख्य सूत्रधार, सहकार महर्षी आदरणीय श्री. अरविंदजी पोरेड्डीवार (सावकार) श्री. प्रकाशजी पोरेड्डीवार (सावकार) यांचे आज त्यांच्या निवासस्थानी जाऊन सहर्ष स्वागत व अभिनंदन केले आणि आशीर्वाद घेतला.
सावकारांचे अनुभवी मार्गदर्शन आणि कार्यकर्त्यांची अहोरात्र मेहनत यामुळेच आरमोरीच्या जनतेने भाजपवर हा विश्वास दाखवला आहे. विकासाची ही गंगा अशीच अविरत सुरू ठेवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.







