नागपूर विभाग पदवीधर मतदार संघ मतदार नोंदणी बाबत पुनरिक्षण कार्यक्रम घोषित

12

नागपूर विभाग पदवीधर मतदार संघ मतदार नोंदणी बाबत पुनरिक्षण कार्यक्रम घोषित

 

गडचिरोली, (जिमाका) दि.1 : भारत निवडणूक आयोगाने दिनांक 12 सप्टेंबर, 2025 च्या पत्रान्वये दिनांक 01 नोव्हेंबर, 2025 या अर्हता दिनांकावर आधारीत नागपुर विभागातील पदवीधर मतदार संघासाठी नव्याने मतदार याद्या तयार करावयाचा पुनरिक्षण कार्यक्रम घोषित केला आहे. दिनांक 14 नोव्हेंबर, 2025 रोजीच्या पत्रान्वये सुधारीत कार्यक्रम पुढीलप्रमाणे घोषित करण्यात आला आहे. दिनांक 01 नोव्हेंबर, 2025 या अर्हता दिनांकावर आधारित नागपूर विभागातील पदवीधर मतदार संघासाठी नव्याने मतदार याद्या (de-novo) पुनरिक्षण कार्यक्रम अंतर्गत, दिनांक 30 सप्टेंबर 2025 ते दिनांक 06 नोव्हेंबर, 2025 अखेर 10875 मतदारांची नोंद झालेली आहे. भारत निवडणूक आयोगाचे दिनांक 12 सप्टेंबर, 2025 अन्वये नमुद कार्यपध्दतीप्रमाणे तसेच मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य, यांनी दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे सदरील प्राप्त अर्ज पदनिर्देशित अधिकारी यांचे मार्फत स्विकारून, मतदान केंद्र स्तरीय अधिकारी यांचे कडून योग्य प्रकारे तपासून सहा मतदार नोंदणी अधिकारी हे अर्ज मंजूर/नामंजूर बाबत निर्णय घेतात. सदरची प्रक्रिया निरंतर असून पात्र नागरिकांनी उपविभागीय अधिकारी कार्यालय / तहसिल कार्यालय मध्ये संबंधीत अर्ज नमुना क्रमांक 18 सादर करावे. तसेच Online अर्ज भरण्याची सुविधा देखील (http://mahaclection.gov.in/Citizen/ACRegistration Details) या link वर उपलब्ध आहे. असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, गडचिरोली अविश्यांत पंडा यांनी कळविले आहे.

0000