*भामरागड तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनी संपन्न*
राज्य विज्ञान शैक्षणिक संस्था, औरंगाबाद यांच्या निर्देशानुसार तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन 2025 26 तालुका भामरागड यांची तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनी कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय भामरागड येथे दिनांक 1 व 2 जानेवारी 2026 ला संपन्न झाली. या कार्यक्रमाचे उद्घाटक श्री किशोर बागडे तहसीलदार भामरागड अध्यक्ष श्री सुरेंद्र गोंगले गटविकास अधिकारी पंचायत समिती भामरागड प्रमुख अतिथी गटशिक्षनाधिकारी निखिल कुमरे श्री सचिन शेवाळे पोलीस निरीक्षक भामरागड श्री मनीष धकाते तालुका आरोग्य अधिकारी भामरागड श्री गिरीश कुलकर्णी प्राचार्य लोक बिरादरी आश्रम शाळा हेमलकसा, मा. श्री देवानंद गायकवाड कृषी अधिकारी पंचायत समिती भामरागड, मा. श्री सुरेश बांबोळे केंद्रप्रमुख भामरागड, सुभाष अन्नदेलवार केंद्रप्रमुख लाहेरी , अनिरुद्ध केंद्रे, केंद्रप्रमुख मन्ने राजाराम राजू मडावी केंद्रप्रमुख गोंगवाडा, मारुती वाचामी मुख्याध्यापक समुह निवासी शाळा, भामरागड, धनिराम तुलावी, गट समन्वयक, गटसाधन केंद्र भामरागड, कालिदास कुनघाडकर साधनव्यक्ती, श्री श्रीमती स्मिता जांभुडे मुख्याध्यापिका कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय भामरागड, इत्यादी मान्यवर उपस्थित होते. डोळ्यांनी अधिकाधिक ज्ञानग्रहण करून त्याचा आपल्या जीवनात वापर करावा असे मार्गदर्शन उद्घाटक माननीय श्री किशोर बागडे यांनी केले. प्रदर्शनीत सर्व विभागातून जवळपास 50 प्रतिकृती व शिक्षक शैक्षणिक साहित्य मांडण्यात आले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंदु रामटेके, केंद्रप्रमुख ताडगांव यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय व भामरागड तालुक्यांतर्गत सर्व शिक्षक यांनी मुलाचे सहकार्य केले.






