प्रतिनिधी गणेश धनवडे इंदापूर निमसाखर येथे दत्त मंदिरामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांची पोर्णिमा अति उत्साहात साजरी करण्यात आली गावातून श्री स्वामींच्या पादुकांची ग्राम प्रदक्षिणा काढण्यात आली तसेच नवीन वर्षाचा संकल्प म्हणून श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आरती साठी पालखी व नगारा मशीन आणण्यात आली तसेच पालखी व नगारा मशीनचे लोकार्पण सोहळा निमसाखर गावचे सरपंच श्री धैर्यशील विजयसिंह रणवरे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला नंतर संध्याकाळी हरिभक्त परायण श्रीकांत महाराज गलांडे यांचे स्वामी चरित्र प्रवचन झाले या कार्यक्रमास सर्व स्वामी भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच विशेष उपस्थिती वालचंद नगर चे स्वामीभक्त श्री राम कुंभार सर होते तसेच पत्रकार गणेश धनवडे यांचा सत्कार गलांडे महाराजांनी केला त्यानंतर स्वामी भक्तांना श्री सुनील हनुमंतराव मोरे यांच्यातर्फे महाप्रसाद देण्यात आला
Home Breaking News इंदापूर निमसाखर येथे दत्त मंदिरामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांची पोर्णिमा अति उत्साहात...






