*अकाली थांबणारे हृदय : पन्नाशीच्या आतील भारतासाठी वाढता मृत्यूचा धोका*
मुंबईचे प्रख्यात हृदयरोगतज्ज्ञ डॉ. नीतू मांडके यांच्या हृदयविकाराने झालेल्या आकस्मिक निधनाने एकेकाळी संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला होता. “हृदय वाचवणारा डॉक्टरच हृदयविकाराने गेला” ही घटना समाजाच्या मनात कायमची कोरली गेली. दुर्दैवाने, आज पुन्हा इतिहास स्वतःची पुनरावृत्ती करत असल्याचे दिसते.
नागपूर येथे भारतातील सुप्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. चंद्रशेखर पाखमोडे यांचे अचानक कार्डियाक अरेस्टमुळे निधन झाले. ३१ डिसेंबर एकादशी असल्याने ३० तारखेला एका डॉक्टर मित्राच्या कार्यक्रमात ते कुटुंबासह सहभागी झाले होते. रात्री आनंद, हास्य — आणि सकाळी अचानक हृदय थांबणे. क्षणात आयुष्य संपणे म्हणजे मृत्यूचा किती क्रूर चेहरा!
डॉ. चंद्रशेखर पाखमोडे हे न्यूरॉन हॉस्पिटलचे कणा होते. आणि शासकीय सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल नागपूरला देखील आपली सेवा प्रदान करीत होते, हजारो अपघातग्रस्त रुग्ण, स्ट्रोकने ग्रस्त मेंदूविकाराचे रुग्ण, अत्यवस्थ अवस्थेतील अनेकांचे प्राण त्यांनी वाचवले. असंख्य रुग्णांचे आशीर्वाद त्यांच्या पाठीशी होते. तरीही अशा विद्वान, अनुभवी आणि समाजोपयोगी तज्ञाचे हृदयविकाराने अकाली जाणे ही केवळ एका कुटुंबाची नव्हे, तर संपूर्ण समाजाची कधीही न भरून काढणारी हानी आहे.
एकेकाळी हृदयविकार म्हणजे साठीनंतरचा आजार मानला जात होता. आज मात्र परिस्थिती भयावह आहे.
३०, ३५, ४०, ४५ वयोगटातील तरुण, यशस्वी, कार्यक्षम व्यक्ती अचानक कोसळताना दिसत आहेत.
विशेषतः डॉक्टर, आयटी व कॉर्पोरेट क्षेत्रातील कर्मचारी, प्रशासकीय अधिकारी, उद्योजक, व्यापारी हे सर्व दीर्घ ताणतणाव, अनियमित जीवनशैली आणि स्वतःकडे दुर्लक्ष याचे बळी ठरत आहेत.
हृदय अकाली का थांबते? –
*मूळ कारणे*
आजचा माणूस “वेळ नाही” या एका वाक्याने स्वतःच्या आरोग्याचा बळी देतो आहे, सातत्याने वाढणारा मानसिक ताण, अनियमित झोप, उशिरापर्यंत जागरण, व्यायामाचा अभाव, धूम्रपान व अति मद्यसेवन, जंक फूड, फास्ट फूड, तेलकट आहार, उच्च रक्तदाब, मधुमेह, कोलेस्टेरॉलकडे दुर्लक्ष..
मला माहिती आहे, मी काहीच तर खात नाही, मी व्यवस्थित डायट करतो..असा अतिआत्मविश्वास – विडंबन म्हणजे नियमित तपासण्या न करणे..
म्हणून प्रतिबंध हाच खरा उपचार
हृदयविकारावर अत्याधुनिक शस्त्रक्रिया आहेत, पण हृदय थांबल्यावर उपचार उशिरा पडतात. म्हणून *प्रतिबंध अत्यावश्यक आहे*
. नियमित तपासणी
पन्नाशीच्या आत असणाऱ्यांनीही :-
ECG, 2D Echo, Lipid Profile, Blood Sugar
वर्षातून किमान एकदा करणे गरजेचे आहे.
ताणतणाव नियंत्रण :-योग, ध्यान, प्राणायाम, सकाळची शांत चाल — हे औषधांइतकेच प्रभावी आहेत.
हालचाल हवीच, दररोज किमान ३० मिनिटे चालणे म्हणजे हृदयाला आयुष्यदान. असांसर्गीक आजार NCD कार्यक्रमाच्या च्या मुख्य तत्वानुसार आठवड्यात किमान ५ दिवस घाम येई पर्यंत ३० मिनिटे श्रमाचे काम किंवा चालणे आवश्यक आहे
आहार शिस्त . भाजीपाला, फळे, कमी तेल, कमी मीठ —चा वापर संतुलित असायला हवे, जेवण करताना
पोट भरायला नाही, हृदय वाचवायला खा. व्यसनमुक्त जीवन, धूम्रपान व अति मद्यसेवन म्हणजे हृदयविकाराचे खुले निमंत्रण आहे म्हणून .झोप आणि समतोल जीवन ठेवण्यावर भर दिले पाहिजे उशिरा पार्टी, सतत जागरण, कामाचा अतिरेक — याला मर्यादा घालायची जीवनशैली तयार केली पाहिजे
शेवटी *एक कटू सत्य*…
डॉ. चंद्रशेखर पाखमोडे यांचे जाणे आपल्याला एकच गोष्ट शिकवते —
यश, पैसा, प्रतिष्ठा असूनही आरोग्याकडे दुर्लक्ष केले तर हृदय क्षणात थांबू शकते.
त्यांच्या स्मृतीस आदरांजली अर्पण करताना आपण एक सामाजिक *संकल्प* करूया —
“आपण आपले कामाला महत्व देतोच. पण कामे करत असताना स्वतःचे हृदय विसरणार नाही.” कारण
थांबलेले हृदय — कोणालाही दुसरी संधी देत नाही.
त्यामुळे आपल्या हृदयाची काळजी घ्या..
आजपासूनच..
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏






