Home Breaking News भामरागड तालुक्यात बाबलाई माता वार्षिक पूजा व सांस्कृतिक संमेलन संपन्न

भामरागड तालुक्यात बाबलाई माता वार्षिक पूजा व सांस्कृतिक संमेलन संपन्न

349

भामरागड तालुक्यात बाबलाई माता वार्षिक पूजा व सांस्कृतिक संमेलन संपन्न

 

भामरागड तालुक्यातील बेजूर गावालगत असलेल्या बेजूर कोंगा पहाडीच्या पायथ्याशी बाबलाई मातेचे प्राचीन मंदिर असून येथे दरवर्षी आदिवासी व गैर-आदिवासी बांधवांच्या उपस्थितीत वार्षिक यात्रा व पूजा साजरी केली जाते. जल, जंगल व जमीन यांवर आधारित जीवनपद्धती जपणाऱ्या आदिवासी समाजासाठी ही यात्रा विशेष महत्त्वाची मानली जाते.

१ जानेवारी ते ३ जानेवारी या कालावधीत बाबलाई माता वार्षिक पूजा व सांस्कृतिक संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या काळात पारंपरिक पूजा, लोकनृत्य व सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले.

या वार्षिक यात्रेदरम्यान “जमीन आपली, जंगल आपले आणि लढाही आपलाच!” या भूमिकेतून जल, जंगल, जमीन आणि ग्रामसभेच्या अधिकारांसाठी सातत्याने काम करणाऱ्या भाई रामदास जराते (शेतकरी कामगार पक्ष), कॉ. अमोल मारकवार (मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष), कॉ. सचिन मोतकुरवार (भारतीय कम्युनिस्ट पक्ष), राज बनसोड (आझाद समाज पक्ष), या कम्युनिस्ट नेत्यांचा सन्मान करण्यात आले या प्रसंगी लालसू नागोटी यांची उपस्थिती होती.आणि चिना माहाका यांनी कार्यक्रम चे संचालन केले

या कार्यक्रमाला परिसरातील आदिवासी बांधव व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. परंपरा, श्रद्धा आणि सामाजिक जाणीव जपणारा हा उपक्रम शांत व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला…

Don`t copy text!