Home Breaking News आधारभुत किंमत खरेदी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी व धान विक्री करण्याचे आवाहन

आधारभुत किंमत खरेदी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी व धान विक्री करण्याचे आवाहन

73

आधारभुत किंमत खरेदी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी व धान विक्री करण्याचे आवाहन

 

 

गडचिरोली, (जिमाका) दि.06: आधारभुत किंमत खरेदी योजनेअंतर्गत दि महाराष्ट्र स्टेट को- ऑप. मार्केटिंग फेडरेशन लिमी. अंतर्गत गडचिरोली जिल्हास्तरावर शासनाची अभिकर्ता संस्था म्हणून जिल्हा मार्केटिंग अधिकारी, कार्यालय गडचिरोली यांच्या मार्फत वडसा, आरमोरी, गडचिरोली, चामोर्शी व मुलचेरा तालुक्यात धान खरेदी प्रक्रिया राबवित आहे.

दि महाराष्ट्र स्टेट को- ऑप. मार्केटिंग फेडरेशन लिमी. कार्यालय जिल्हा मार्केटिंग अधिकारी गडचिरोली मार्फत शेतकरी बांधवांना आवाहन करण्यात येते की, आधारभुत किंमत खरेदी योजना हंगाम 2025-26 मध्ये शासन निर्णयातील अटी व शर्ती नुसार धान खरेदी करीता शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी व धान विक्री करत्यावेळी आपल्याला पुढील प्रमाणे सुचना देण्यात येत आहेत. खरेदी केंद्रावर ऑनलाईन नोंदणी करत्यावेळी कोणत्याही प्रकारची नोंदणी शुल्क देय्य नाही. धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांकडुन धान खरेदी करत्यावेळी एक कट्ट्याचे बजन 40.600 कि.ग्रा. पेक्षा जास्त घेता येत नाही. शेतकऱ्यांनी धान विक्री करतांना कोणत्याही प्रकारची हमाली रक्कम किंवा कोणत्याही प्रकारची रोख रक्कम खरेदी केंद्राना देवु नये. त्याअनुषंगाने वरील प्रमाणे सुचनेनुसार आपल्यामार्फत पिकविलेला साधारण धान कवडीमोल भावाने कोणत्याही व्यापाऱ्यास तथा इतरत्र न विकता शासनाने दिलेल्या आधारभुत दरानेच विक्री करावयाच्या दृष्टीने तालुक्यातील शासनाच्या धान खरेदी केंद्रावर ऑनलाईन नोंदणी करुन धान खरेदी केंद्रावर धान विक्री करावे तसेच कोणत्याही प्रकारच्या अनियमिततेला बळी पडु नये. धान खरेदी केंद्रावर धान विक्री करत्यावेळी कोणत्याही प्रकारची अनियमितता आढळुन आल्यास/झाल्यास जिल्हा मार्केटिंग अधिकारी, कार्यालय गडचिरोली येथे तक्रार नोंदवावी.

0000

Don`t copy text!