Home Breaking News पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन

पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन

82

पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन

 

 

गडचिरोली, (जिमाका) दि.06: जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गडचिरोली, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, गडचिरोली आणि इकॉनॉमिक्स इंडस्ट्रीज प्रा.लि.अॅन्ड सोलार इंडिस्ट्रियल इंडिया लिमिटेड, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, गडचिरोली येथे १०.०० वाजता पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित करण्यात आलेले आहे.

सदर रोजगार मेळाव्यामध्ये इकॉनॉमिक्स इंडस्ट्रीज प्रा.लि. अॅन्ड सोलार इंडिस्ट्रियल इंडिया लिमिटेड, नागपूर ही कंपनी उपस्थित असणार असून उमेदवारांना रोजगार व स्वयंरोजगाराचा लाभ घेण्यासाठी सदर रोजगार मेळाव्याकरिता असलेले ईच्छूक उमेदवारांनी स्वतःचा बायोडाटा, आधार कार्ड, शैक्षणिक प्रमाणपत्रांच्या झेराक्स सह स्वखर्चाने दि. ०८ जानेवारी २०२६ रोजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, गडचिरोली येथे उपस्थित राहून रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गडचिरोली या कार्यालयाने आवाहन केले आहे.

0000

Don`t copy text!