Home Breaking News *जिद्द व चिकाटीनेच यश मिळते एड. विश्वजीत मारोतराव कोवासे*

*जिद्द व चिकाटीनेच यश मिळते एड. विश्वजीत मारोतराव कोवासे*

100

*जिद्द व चिकाटीनेच यश मिळते एड. विश्वजीत मारोतराव कोवासे*

 

*गडचिरोली*

 

* *युवकांनी जीवनात येणाऱ्या अडचणींमुळे खचून न जाता जिद्द व चिकाटीने प्रयत्न केल्यास निश्चितच यश मिळते, असे प्रतिपादन भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव ॲड. विश्वजीत मारोतराव कोवासे यांनी केले.*

 

सक्षम IAS अकॅडमी, गडचिरोली यांच्या वतीने स्वामी विवेकानंद जयंती व युवा दिनाचे औचित्य साधून आयोजित पोलीस भरती लेखी परीक्षेच्या बक्षीस वितरण समारंभात ते अध्यक्ष म्हणून बोलत होते.

 

या कार्यक्रमाला नगर परिषदेचे माजी बांधकाम सभापती राजु भाऊ कात्रटवार, गडचिरोली नगर परिषदेचे नवनियुक्त नगरसेवक लीलाधर भरडकर, प्रकाश ताकसांडे, अनिकेत राऊत, यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच सक्षम अकॅडमीचे संचालक आकाश संगमवार, देशमुख सर, मेश्राम सर यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

Don`t copy text!