*चामोर्शी शहरातील चामोर्शी मार्कंडा बायपास रस्ता प्रशासनाने तात्काळ सुरू करावा!.*
चामोर्शी दिनांक 13 जानेवारी 2026
चामोर्शी शहरातील अतिशय महत्त्वाचा व जिव्हाळ्याचा प्रश्न असलेला विदर्भाची काशी मार्कंडा देवस्थान या ठिकाणी गडचिरोली मार्गांवरून चामोर्शी ते मार्कंडा देवस्थान येथे जाणारा प्रस्तावित रस्ता या आधीचे तत्कालीन आमदार डॉ. देवराव होळी यांनी प्राधान्याने लक्ष देऊन सुरू केला होता या करिता राज्य शासनाने निधीची सुद्धा निधीची सुद्धा तरतूद केली होती व बांधकाम विभागाने अनेक शेतकऱ्यांचे शेतीचे अधिग्रहण सुद्धा केले होते, मिळालेल्या माहितीनुसार अनेक शेतकऱ्यांनी राज्य शासनाच्या कमी पैसे देण्याच्या कारणावरून शेतीतून रस्ता देण्यास नकार दिलेला होता .परंतु सदर विषय कुठे मुरला याकडे तालुका प्रशासनाचे कुठलेच लक्ष नाही त्यामुळे आज राष्ट्रीय मानवाधिकार संघटना महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष डॉक्टर प्रणय भाऊ खुणे यांच्या मार्गदर्शनाखाली गडचिरोली जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी,उपाध्यक्ष किशोर कुंडू व तालुक्याचे सल्लागार व मार्गदर्शक भाजपाचे ज्येष्ठ नेते श्रावण पाटील सोनटक्के व बंडू पाटील नैताम व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी आज गडचिरोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर मिलिंद भाऊ नरोटे यांचे जनसंपर्कक्ष क्रमांक दोन या ठिकाणी भेट दिली व सदर मागणी विद्यमान आमदार मिलिंद भाऊ नरोटे यांनी लक्ष द्यावे व सदर रास्ता तात्काळ सुरू करावे अशी मागणी जनसंपर्क कार्यालय प्रमुख विनोद किरमे यांना निवेदन देऊन करण्यात आली, यावेळी कार्यालय सहायिका मनीषा ताई बोधनवार व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.






