Home Breaking News अंध विद्यार्थ्यांच्या प्रभात फेरीतून ग्राहक जनजागृतीचा संदेश

अंध विद्यार्थ्यांच्या प्रभात फेरीतून ग्राहक जनजागृतीचा संदेश

97

अंध विद्यार्थ्यांच्या प्रभात फेरीतून ग्राहक जनजागृतीचा संदेश

गडचिरोली, प्रतिनिधी :

अखिल भारतीय ग्राहक पंचायत, जिल्हा गडचिरोली यांच्या वतीने ग्राहक जनजागृती उपक्रम राबविण्यात आला. राष्ट्रीय दृष्टीहीन संघ, महाराष्ट्र यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय अंध कल्याण शैक्षणिक सप्ताह–२०२६ च्या निमित्ताने गडचिरोली येथे अंध विद्यार्थी–विद्यार्थिनींच्या सहभागाने भव्य प्रभात फेरी काढण्यात आली.

या प्रभात फेरीतून “चला, ग्राहक हक्कांच्या रक्षणासाठी एकत्र येऊया” अशा घोषणा देण्यात आल्या. या उपक्रमामुळे गडचिरोली जिल्ह्यात ग्राहक चळवळ अधिक बळकट होईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.

ही प्रभात फेरी नगराध्यक्ष प्रणोती सागर निंबोरकर यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आली.

यावेळी ग्राहक पंचायतच्या गडचिरोली जिल्हा महिला प्रमुख सुचिता उदय धकाते, प्रा. सुनीता विजय साळवे, अश्विनी भांडेकर, शिल्पा गव्हारे, स्मिता नेताम, जिल्हाध्यक्ष उदय धकाते, जिल्हा उपाध्यक्ष विजय साळवे, जिल्हा सचिव अरुण पोगळे आदींनी प्रभात फेरीत सक्रिय सहभाग नोंदविला.

या उपक्रमातून अंध विद्यार्थी–विद्यार्थिनींमध्ये ग्राहक हक्कांविषयी जागृती निर्माण होत असून समाजातील प्रत्येक घटकाला ग्राहक संरक्षण चळवळीत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.

Don`t copy text!