Home Breaking News निखिल चरडे निर्विरोध नगर परिषद उपाध्यक्ष स्विकृत नगरसेवपदी सागर निंबोरकर,सुधाकर येनगंधलवार,तर...

निखिल चरडे निर्विरोध नगर परिषद उपाध्यक्ष स्विकृत नगरसेवपदी सागर निंबोरकर,सुधाकर येनगंधलवार,तर काँग्रेसचे नंदू कायरकर यांची निवड

239

निखिल चरडे निर्विरोध नगर परिषद उपाध्यक्ष

स्विकृत नगरसेवपदी सागर निंबोरकर,सुधाकर येनगंधलवार,तर काँग्रेसचे नंदू कायरकर यांची निवड

 

*गडचिरोली:* नगरपालिकेत युवा नेतृत्वाची नवी ऊर्जा पाहायला मिळत आहे. भाजपाच्या पूर्ण पाठिंब्याने निखिल चरडे यांची नगर परिषद उपाध्यक्ष म्हणून निर्विरोध निवड करण्यात आली आहे. तर स्विकृत नगरसेवकपदी सागर निबोरकर,सुधाकर येनगंधलवार,तर काँग्रेसचे नंदू कायरकर यांची निवड करण्यात आली.ज्यामुळे नव्या नेतृत्वाची गरज आणि महत्त्व अधोरेखित झाले.

 

नव्या नेतृत्वामुळे नगरपालिकेतील विकास, स्वच्छता, सामाजिक उपक्रम आणि जनकल्याणाच्या योजनांना नव्या गतीने सुरुवात होईल, असा विश्वास सर्वांमध्ये निर्माण होत आहे.

 

विशेषतः शहरात युवकांमध्ये नेतृत्व करण्याची आवड आणि सामाजिक बांधिलकी वाढविण्याचा प्रयत्न यामध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे. शहरातील नागरिकांनीही या निवडीवर समाधान व्यक्त केले असून, नव्या टीमकडून पारदर्शक आणि प्रभावी प्रशासनाची अपेक्षा व्यक्त केली आहे.

 

नगरपालिकेतील युवा नेतृत्वाचे संतुलन साधल्यामुळे आगामी काळात शहराच्या सर्व क्षेत्रांमध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्याची संधी अधिक वाढली आहे.

Don`t copy text!