Home Breaking News महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ तालुका शाखा चामोर्शी. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक...

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ तालुका शाखा चामोर्शी. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाकडून आलेल्या प्रश्नांची सोडवणूक त्वरित करु

55

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ तालुका शाखा चामोर्शी. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाकडून आलेल्या प्रश्नांची सोडवणूक त्वरित करु:-➡️चामोर्शी पं.स.चे मा.गटशिक्षणाधिकारी श्री सुधीर uhhआखाडे यांची महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ तालुका शाखा चामोर्शी च्या शिष्टमंडळाला ग्वाही.

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ तालुका शाखा चामोर्शी च्या शिष्टमंडळाने चामोर्शी पं.स.अंतर्गत कार्यरत प्राथमिक शिक्षकांच्या विविध प्रलंबित समस्यांचे अनुषंगाने पं.स.चामोर्शी चे सन्माननीय गटशिक्षणाधिकारी श्री सुधीर आखाडे साहेब यांची प्रत्यक्ष भेट घेऊन प्रलंबित विविध समस्यांचे निवेदन दिले व निवेदनातील समस्यांचे निराकरण करण्यासाठी सविस्तर चर्चा केली. यावर मा.गटशिक्षणाधिकारी श्री सुधीर आखाडे यांनी निवेदनातील प्रलंबित समस्या ऐकून घेऊन प्रलंबित समस्या त्वरित सोडविण्यात येणार असल्याची ग्वाही उपस्थित महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाला दिली आहे. 👉 याप्रसंगी निवेदनातील प्रलंबित समस्यांवर गटशिक्षणाधिकारी श्री सुधीर आखाडे यांचेशी चर्चा करतांना महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष श्री रघुनाथ भांडेकर ,चामोर्शी शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष तथा चामोर्शी प्राथमिक शिक्षक सहकारी कर्मचारी पतसंस्थेचे संचालक श्री मारोती वनकर ,तालुका सरचिटणीस श्री रुषीदेव कुनघाडकर ,तालुका मुख्य सल्लागार श्री सिद्धार्थ सोरते,तालुका कार्याध्यक्ष श्री महादेव डे ,तालुका प्रसिद्धी प्रमुख श्री सुनिल सातपुते ,तालुका युवा आघाडी माजी अध्यक्ष तथा चामोर्शी प्राथमिक शिक्षक सहकारी कर्मचारी पतसंस्थेचे संचालक श्री सुजित दास ,तालुका कार्यालयीन चिटणीस श्री हरिश नंदनवार ,तालुका उपाध्यक्ष श्री प्रल्हाद चव्हाण , तालुका उपाध्यक्ष श्री विजय दुधबावरे तालुका सल्लागार श्री राजकुमार कुळसंगे तालुका सल्लागार श्री विनायक रोहणकर तालुका सल्लागार श्री चंद्रकांत वेटे यांसह आदी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Don`t copy text!