Home Breaking News *नागपूर मनपा निवडणूक : भाजपाचा ऐतिहासिक विजय, आज सायंकाळी गडकरी वाड्यासमोर विजयाचा...

*नागपूर मनपा निवडणूक : भाजपाचा ऐतिहासिक विजय, आज सायंकाळी गडकरी वाड्यासमोर विजयाचा जल्लोष*

96

*नागपूर मनपा निवडणूक : भाजपाचा ऐतिहासिक विजय, आज सायंकाळी गडकरी वाड्यासमोर विजयाचा जल्लोष*

 

नागपूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत एकूण १५१ जागांपैकी तब्बल ११० जागांवर भारतीय जनता पार्टीने आघाडी घेत ऐतिहासिक यश मिळवले आहे. या दणदणीत विजयाच्या पार्श्वभूमीवर आज सायंकाळी भव्य विजय जल्लोषाचे आयोजन करण्यात आले आहे.

 

आज सायंकाळी ६.३० वाजता नागपूर शहरातील महाल येथील मा. केंद्रीय मंत्री श्री. नितीनजी गडकरी यांच्या निवासस्थानासमोर नागपूर महानगरपालिका निवडणूक विजयाचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. या विजय जल्लोषाला मा. केंद्रीय मंत्री श्री. नितीनजी गडकरी, मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस तसेच मा. पालकमंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

 

नागपूरकरांनी भारतीय जनता पार्टीवर दाखवलेल्या विश्वासामुळे हा विजय शक्य झाला असून, शहराच्या सर्वांगीण विकासासाठी जनतेने भाजपाला कौल दिल्याची भावना यावेळी व्यक्त केली जात आहे. या ऐतिहासिक विजयाच्या आनंदात सहभागी होण्यासाठी मोठ्या संख्येने भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरीक उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली आहे.

Don`t copy text!