Home Breaking News *आश्रम शाळेत शिकणारा विद्यार्थी सुद्धा मोठा अधिकारी बनू शकतो आणि देशाच्या सेवेत...

*आश्रम शाळेत शिकणारा विद्यार्थी सुद्धा मोठा अधिकारी बनू शकतो आणि देशाच्या सेवेत हातभार लावू शकतो भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव तथा संस्थेचे उपाध्यक्ष विश्वजीत मारोतराव कोवासे*

130

*आश्रम शाळेत शिकणारा विद्यार्थी सुद्धा मोठा अधिकारी बनू शकतो आणि देशाच्या सेवेत हातभार लावू शकतो भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव तथा संस्थेचे उपाध्यक्ष विश्वजीत मारोतराव कोवासे*

 

*अड्याळ येथे पालक मेळावा व सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न*

 

*📍चामोर्शी :*

 

अड्याळ तालुका चामोर्शी, जिल्हा गडचिरोली येथे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, गडचिरोली अंतर्गत बहुउद्देशीय आदिवासी विकास मंडळ, गडचिरोली द्वारा संचलित अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा अड्याळ येथे पालक मेळावा तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

 

या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव ऍड. विश्वजीत मारोतराव कोवासे, प्रमुख पाहुणे आष्टी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विशाल काळे, साईनाथ कोडापे, रवींद्र कोवे महाराज, नदीम नाथानी, अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष रजनीकांत मोडघरे, गडचिरोली जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितेश राठोड, गणेश धाईत, चामोर्शी तालुका युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रेमानंद गोंगले, पेंदाम बाबूजी आदी मान्यवर उपस्थित होते.

तसेच आश्रम शाळेचे मुख्याध्यापक धोंगडे सर, अड्याळ पोलीस पाटील विजयभाऊ तलांडे, किशोर कोवासे सर, तलांडे सर यांच्यासह शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीवृंद आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

 

कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक सादरीकरणातून आपली कला सादर केली. पालक मेळाव्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबाबत मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या शिक्षक व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Don`t copy text!