Home Breaking News विजय जरूर अभिनंदनीय , पण उतू नका माजू नका…. हेमंत गडकरी

विजय जरूर अभिनंदनीय , पण उतू नका माजू नका…. हेमंत गडकरी

85

विजय जरूर अभिनंदनीय , पण उतू नका माजू नका…. हेमंत गडकरी

 

महाराष्ट्रातील विविध महापालिकेमध्ये भाजप व महायुतीचा झालेला विजय हा जरूर अभिनंदन असा आहे, त्याबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस व त्यांच्या पक्षातील नवनिर्वाचित नगरसेवक यांचे मनःपूर्वक अभिनंदन.

मात्र या विजयाने उतू नका मातू नका , व राज्यातील मंत्री नितेश राणे यांच्यासारख्यांनी फालतू वक्तव्य करू नये ,

इतर वेळी जनता जनार्दन भाजपच्या जनप्रतिनिधी बद्दल वाटेल ते बोलत असतो, चीड व्यक्त करीत असतो, असे असूनही कुठल्या फॅक्टरने यांच्या निष्क्रिय उमेदवारांना विजय प्राप्त होतो हे न समजण्यापलीकडचे आहे, असो जो जीता वो सिकंदर, सर्व विजयी नगरसेवकांनी आता कामाला लागावे , तीन वर्षापासून महापालिका या प्रशासकीय राजवटीत होत्या, अंतर्गत वसाहतीतील बरेच प्रश्न आ फाडून उभे आहेत, मनपातील कारभार हातात घेताच कामाला लागा व अंतर्गत वसाहतीतील प्रश्न मार्गी लावा , व जनतेला दिलासा द्या , विकास रुपी कामाकरिता आपणास शुभेच्छा…. हेमंत गडकरी, प्रदेश सरचिटणीस मनसे

Don`t copy text!