Home Breaking News *पीएम यशस्वी योजनेअंतर्गत मॅट्रिकपूर्व व मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती अर्ज नोंदणीसाठी 31 जानेवारी पर्यंत...

*पीएम यशस्वी योजनेअंतर्गत मॅट्रिकपूर्व व मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती अर्ज नोंदणीसाठी 31 जानेवारी पर्यंत मुदत*

124

*पीएम यशस्वी योजनेअंतर्गत मॅट्रिकपूर्व व मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती अर्ज नोंदणीसाठी 31 जानेवारी पर्यंत मुदत*

 

गडचिरोली, (जिमाका) दि. 22 : केंद्र शासन पुरस्कृत प्रधानमंत्री यंग अचीव्हर्स स्कॉलरशिप अवॉर्ड स्कीम (PM YASASVI) योजनेअंतर्गत राज्यातील विजाभज (विमुक्त जाती व भटक्या जमाती), इमाव (इतर मागास वर्ग) व विमाप्र (विशेष मागास प्रवर्ग) या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी मॅट्रिकपूर्व (इयत्ता 9 वी व 10 वी) तसेच मॅट्रिकोत्तर शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना लागू करण्यात आली आहे. इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या शासन निर्णय दिनांक 20 जून 2025 नुसार ही योजना अंमलात असून, पात्र विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीचे अर्ज नॅशनल स्कॉलरशिप पोर्टल (NSP) वर ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करणे आवश्यक आहे.

 

या योजनेअंतर्गत अर्ज नोंदणीची अंतिम तारीख 31 जानेवारी 2026 अशी निश्चित करण्यात आली आहे. तसेच संबंधित शाळा व महाविद्यालयांनी संस्था स्तरावर पडताळणी करण्यासाठीची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2026 आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व पात्र विद्यार्थ्यांनी वेळेत अर्ज सादर करावेत व संबंधित प्राचार्य व मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांचे अर्ज पडताळणीची कार्यवाही विहित कालावधीत पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

पीएम यशस्वी योजनेंतर्गत शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी शैक्षणिक पात्रता, प्रवर्ग प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, आधार क्रमांक, बँक खाते तपशील आदी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज भरावा. अर्ज प्रक्रियेत कोणतीही त्रुटी राहू नये, यासाठी शाळा व महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना आवश्यक मार्गदर्शन करावे, असेही नमूद करण्यात आले आहे.

 

अर्ज नोंदणी अथवा पडताळणी प्रक्रियेसंदर्भात कोणतीही अडचण असल्यास संबंधितांनी इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय, गडचिरोली येथे संपर्क साधावा, असे आवाहन डॉ. सचिन मडावी, सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय, गडचिरोली यांनी केले आहे.

 

0000

Don`t copy text!