शिव सेना तालुका कार्यालय भामरागड येथे हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी
भामरागड : वृत्तवानी न्यूज तमाम शिव सैनिकांच्या उपस्थितीत आज दिनांक 23/01/2026रोजी. वंदनीय हिंदूहृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे यांची जयंती दिवस म्हणून साजरी करण्यात आली. त्यांच्या जयंती निमित्य कार्यकर्त्यांना प्रमुख मार्गदर्शन तालुका प्रमुख दिनेशजी मडावी, तालुका संघटक श्री. खुशाल भाऊ मडावी, तालुका सचिव श्री. प्रभाकरजी गावडे, तालुका शहर प्रमुख, श्री गजाननजी उईके, तसेच शिव सेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते दिपक ठेकामं, हरीश मडावी, देव वड्डे, अरुण मडावी, आदित्य येरमे, निखिल वेलादि,प्रकाश नायक, कामगार सेना प्रमुख श्रीकांत मडावी, यशवंत मडावी, सचिन आत्राम, सचिन तलांडे,तमाम कार्यकर्ते यांनी अभिवादन केले. वंदनीय हिंदूहृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे त्यांचे विचार निर्भीड नेतृत्व आणि मराठी माणसासाठी केलेले काम राजकारणातील अनेक घडामोडी चे स्मरण करून जयंती साजरी करण्यात आले.






