Home Breaking News *लखमापुर बोरी येथे गुणवंतांचा सत्कार सोहळा संपन्न*

*लखमापुर बोरी येथे गुणवंतांचा सत्कार सोहळा संपन्न*

385

*लखमापुर बोरी येथे गुणवंतांचा सत्कार सोहळा संपन्न*

26 जानेवारी 2026 रोजी गणराज्य दिनाचे औचित्य साधून *बोरी ऑफिसर्स अँड फ्रेंड्स वेल्फेअर फंड लखमापूर बोरी* यांच्यावतीने लखमापूर बोरी गावातील फेब्रुवारी/मार्च 2025 मधील इयत्ता दहावी आणि बारावी तील *प्राविण्य प्राप्त विद्यार्थी तसेच गावातील नवनियुक्त शासकीय कर्मचारी म्हणून नियुक्ती झालेल्या तरुणांचा* सत्कार सोहळा जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा लखमापूर बोरी येथे शाळेतील विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या उद्घाटननिय सोहळ्या प्रसंगी पार पडला.

या सत्कार सोहळ्यात *इयत्ता दहावीतील गावातून प्रथम आलेला प्रज्वल घनश्याम बोलीवार ,द्वितीय कु. नियती मुकुंदा बारसागडे तृतीय अमानतली गुलाबअली सय्यद,*

तसेच बारावीतील गावातून *प्रथम भारत हिवराज सुरजागडे,द्वितीय कु.श्रुतिका सुरेश सोनटक्के तृतीय कु.दीप्ती पुंडलिक कोहळे यांना सन्मानचिन्ह तसेच प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला*

त्याचप्रमाणे गावातील नवनियुक्त शासकीय कर्मचारी म्हणून निवड झालेल्या तरुणांचा सुद्धा या प्रसंगी शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. *नवनियुक्त शासकीय कर्मचारी खुशाल देविदास बारसागडे, प्रीतम प्रमोद सातपुते, साहिल रवींद्र पिपरे, अरुण विनोद गेडाम, शुभम सुरेश कुंघाडकर, राकेश विलास पिपरे, अंकुश तामदेव वैरागडे, अंकुश हरिदास वैरागडे, राजकुमार चरणदास बारसागडे , आशिष चरणदास बारसागडे या तरुणांचा सत्कार करण्यात आला*

या सत्कार सोहळ्याला उद्घाटक म्हणून सौ किरणताई सुरजागडे सरपंच तर अध्यक्ष म्हणून श्री सुरज पिपरे शा. व्य. समिती अध्यक्ष, सह उदघाटन श्री निकेश गददेवार ,श्री. विनोद भोयर उपसरपंच,ग्रा.सदस्य श्री भाग्यवान पिपरे , केंद्रप्रमुख श्री. बदखल सर शाळेचे मुख्याध्यापक श्री नारदेलवार सर , तसेच ग्रामपंचायत पदाधिकारी, शा. व्य. समिती पदाधिकारी ,आणि गावातील प्रतिष्ठित नागरिक , पालक वर्ग आणि विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. *या सत्कार सोहळ्यासाठी बोरी ऑफिसर्स अँड फ्रेंड्स वेल्फेअर फंडाचे अध्यक्ष श्री अविनाश बारसागडे, उपाध्यक्ष श्री टिकाराम शेंडे, सचिव श्री बंडू बारसागडे, कोषाध्यक्ष श्री प्रल्हाद वैरागडे,तसेच फंडाचे सदस्य श्री गणेश सातपुते श्री संदीप कोसरे श्री रामचंद्र सत्तरवार श्री संदीप कोसरे ,डाँ.वैजेश्वर बटराखाये, श्री संजय दुधबळे श्री किशोर बोदलकर,श्री. देवेंद्र सत्तरवार, श्री अमोल सत्तरवार, श्री पठाण सर, श्री रवींद्र वासेकर, श्री विनोद वैरागडे,श्री.प्रकाश बारसागडे, श्री.उमाजी बारसागडे, श्री.राजू बारसागडे ,श्री.मधु मडावी हे उपस्थित होते.या सत्कार सोहळ्यासाठी वेल्फेअर फंडातील इतर सर्व सदस्यांचे मोलाचे सहकार्य लाभले*

बोरी ऑफिसर्स अँड फ्रेंड्स वेलफेअर फंडाकडून गाव हितासाठी राबवित असलेल्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल वेल्फेअर फंडाच्या सर्व सदस्यांचे उपस्थित मान्यवरांनी ,तसेच गावकऱ्यांनी अभिनंदन करून आभार मानले.

हा सत्कार सोहळा विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला.

Don`t copy text!