*सायगाव येथे राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबिराचे उद्घाटन*
दिनांक 27 जानेवारी
आरमोरी येथील महात्मा गांधी कला, विज्ञान व स्व. न. पं. वाणिज्य महाविद्यालय यांच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाचे विशेष शिबिर सायगाव येथे उत्साहात आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन माननीय आमदार श्री. रामदासजी मसराम यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
या प्रसंगी सचिव, मनोहरभाई शिक्षण प्रसारक मंडळ आरमोरी – अध्यक्ष. श्री. रिद्धेश्वरजी वामनरावजी वनमाळी, प्राचार्य मा. डॉ. लालसिंग खालुसा, मा. दिपकभाऊ वनमाळी साहेब, सामाजिक कार्यकर्ते मा. धनपालजी मिसार, मा. उमाकांतजी वनमाळी साहेब, खेमराज प्रधान,मा. निशांतजी वनमाळी, श्री. महेश बरडे, श्री. सुरज हारगुडे ,सरपंच, सायगाव मा. सौ. शिल्पाताई कोल्हे ,मुख्याध्यापक मा. श्री. वामनजी कामठे ,उपसरपंच, सायगाव,मा. श्री. मनोज पांचलवार तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी, प्राध्यापकवृंद, ग्रामस्थ तसेच स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपल्या उद्घाटनपर भाषणात माननीय आमदार श्री. रामदासजी मसराम यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये समाजसेवेची भावना निर्माण होते, तसेच सामाजिक जबाबदारीची जाणीव वाढते, असे प्रतिपादन केले.
या विशेष शिबिराअंतर्गत स्वच्छता अभियान, आरोग्य जनजागृती, वृक्षारोपण, सामाजिक प्रबोधन आदी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन NSS विभागाच्या वतीने करण्यात आले.






