भेदरलेल्या कोरोणा रुग्णांना खा.मेंढेचे सांत्वन !

203

भेदरलेल्या कोरोणा रुग्णांना खा.मेंढेचे सांत्वन !

जिल्हा रुग्णालयात म्रुत्युने तांडव मांडले. २५ रुग्ण दगावले. हा भंडार्याचा उच्चांक होता. रुग्णालयातील प्रेताच्या ठिगाने रुग्ण भयभीत झाले. नातेवाईकही भेदरले. हे वातावरण निवळावे. विस्वास निर्माण व्हावा म्हणून खा.सुनिल मेंढे प्रोटोकॉल तोडत थेट जिल्हा रुग्णालयात गेले. रुग्णाला भेटले. नातलगांचे सांत्वन केले. धिर दिला. यावेळी वातावरण भावुक झाले.

गुरुवारी खा.सुनील मेंढे सरकारी दवाखान्यात गेले. १७‌ डेड बॉडी वेटिंगवर होत्या. पावलोपावली ठिकठिकाणी पडलेल्या डेड बॉडी ओलांडताना कोणाचाही हात डोळे पुसायला जाईल. असे कंपीत वातावरण ! सुरवातीला अतिदक्षता विभागात गेले. रुग्णांची विचारपूस, डबा, औषधी इत्यादी गोष्टीची विचारपूस केली जात होती. एवढ्यात एक तरुण आला. खासदार साहेबांना बोलला. माझ्या बाबाकडे चला. त्यांना सांत्वन द्या. त्यांनी धिर सोडला. खासदार त्यांच्या कडे गेले. हिम्मत दिली. मुलांच्या डोळ्यात पाणी आले. वातावरण भावुक झाले. या वार्डात रोज १०-१५ रुग्ण दगावतात. येथील वातावरण भयावह आहे. येथे नातलगही थांबत नाही. खासदार भेटीला आले म्हणून गंभीर वातावरणातुन पाझिटिव्ह एनर्जी निर्माण झाली. रुग्णांच्या चेहर्यावरून जाणवत होते. यावेळी मोहन सुरकर, अनिल मेंढे उपस्थित होते.

जनरल वार्डातील रुग्णांची विचारपूस केली. रुग्णाचे नातेवाईक विविध समस्या सांगत होते. अविनाश खेडीकर व स्वप्नील नोंद घेत होते. सर्वांना दिलासा देण्याचे काम यानिमित्त झाले. तब्बल तीन तास या कोव्हीड रुग्णासोबत खा.मेंढेनी घालवले. यावेळी खासदारांना जिल्हाधिकारी संदिप कदम यांच्याकडून बोलावणे आले. जिल्हाधिकारी रुग्णालयात सि.एस. साहेबांच्या कैबीनमध्ये आले होते. तिथेच प्रभारी जिल्हा अधीक्षक डॉ.नाईक होते. आक्सिजन, रेडीमीशियर या विषयावर चर्चा झाली. जिल्हाधिकारी यांनी खा.मेंढेंना स्वीपर पुरवा असी विनंती केली. त्यांनी लगेच होकार दिला.
या दौर्याने म्रुर्तुशय्यवर असणार्या रुग्णांना दिलासा मिळाला. मानसिक आधार दिला. कारणं बहुतेक वेळा घाबरून लोक मरतात.