*गडचिरोली जिल्हा पोलीस दल भरतीस पहिल्या दिवशी तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद:*
गडचिरोली जिल्हा पोलीस भरती (२०२४-२५) च्या मैदानी चाचणी आज दिनांक 11 फेब्रुवारी पासून सुरुवात झाली आहे. आज रोजी चालक पोलीस शिपाई पदाकरिता च्या मैदानी चाचणीसाठी एकूण १,३०० तरुणांना बोलविण्यात आले होते, यापैकी एकूण १,१८५ तरुण चाचणी करीत हजर झाले होते. हजर तरुणांपैकी पात्र १,०६८ तरुणांची चालक पोलीस शिपाई पदाकरिताची मैदानी चाचणी आज रोजी पूर्ण झालेली आहे.






