Home Breaking News *जि.प.प्राथ.शाळा ढेकणीची व्यावसायिक शैक्षणिक क्षेत्रभेट*

*जि.प.प्राथ.शाळा ढेकणीची व्यावसायिक शैक्षणिक क्षेत्रभेट*

69

*जि.प.प्राथ.शाळा ढेकणीची व्यावसायिक शैक्षणिक क्षेत्रभेट*

जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या मार्गदर्शनानुसार अनुभवाधारित व कौशल्याधिष्ठित शिक्षण उपक्रमांतर्गत तसेच माझी शाळा माझा अभिमान या उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, ढेकणी येथील विद्यार्थ्यांची व्यावसायिक शैक्षणिक क्षेत्रभेट स्थानिक वीट भट्टी निर्मिती केंद्राला आयोजित करण्यात आली.

सदर क्षेत्रभेटीमध्ये विद्यार्थ्यांना वीट निर्मितीची संपूर्ण प्रक्रिया प्रत्यक्ष अनुभवता आली. मातीची निवड व प्रक्रिया, साच्यात वीट तयार करणे, वीटा वाळवणे तसेच भट्टीत योग्य तापमानावर वीटा भाजण्याची प्रक्रिया याबाबत निर्मला ताडामी यांनी विद्यार्थ्यांना सविस्तर व शास्त्रशुद्ध माहिती दिली. विद्यार्थ्यांनी प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून व प्रत्यक्ष कृतीतून सक्रिय सहभाग नोंदविला.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना श्रमप्रतिष्ठेचे महत्त्व, स्थानिक व्यवसायांचे सामाजिक व आर्थिक योगदान तसेच व्यावसायिक कौशल्यांची ओळख प्राप्त झाली. जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या अनुभवाधारित शिक्षण संकल्पनेनुसार अशा शैक्षणिक क्षेत्रभेटी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासास पूरक ठरत आहेत.

सदर उपक्रमाच्या वेळी शाळेचे मुख्याध्यापक राजेश्वर मुलकलवार, शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष सुखदेव कुमोटी उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांच्या अध्ययन प्रक्रियेत प्रत्यक्ष अनुभवाला अनन्यसाधारण महत्त्व असून अशा उपक्रमांचे सातत्याने आयोजन आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. शाळेच्या या उपक्रमाचे पालक व स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

Don`t copy text!