Home Breaking News नोकरीचे आमिष दाखवून शहीद जवानांच्या कुटंुबियांची फसवणूक करणाया आरोपीस गडचिरोली पोलीसांनी केली...

नोकरीचे आमिष दाखवून शहीद जवानांच्या कुटंुबियांची फसवणूक करणाया आरोपीस गडचिरोली पोलीसांनी केली अटक

238

 

नोकरीचे आमिष दाखवून शहीद जवानांच्या कुटंुबियांची फसवणूक करणाया आरोपीस गडचिरोली पोलीसांनी केली अटक

 स्थानिक गुन्हे शाखा व पोस्टे गडचिरोली येथील पोलीस पथकांकडून 24 तासाच्या आत आरोपी अटक

 वर्ग-1 पदाच्या नोकरीसाठी तब्बल 2 कोटी 16 लाख रुपयांची केली होती फसवणूक

 

सविस्तर वृत्त असे आहे की, गडचिरोली पोलीस दलात कार्यरत असताना सन 2013 साली मौजा तोडगट्टा जंगल परिसरात झालेल्या पोलीस आणि माओवादी चकमकीमध्ये पोअं/गणपत नेहरु मडावी हे शहीद झाले होते. शहीद अधिकारी व अंमलदार यांच्या वारसांना अनुकंपा तत्वावर शासनाकडून नोकरी देण्यात येत असते. यावरुन शहीद गणपत मडावी यांच्या मृत्युनंतर त्यांचा मुलगा नामे सागर गणपत मडावी याने अनुकंपा तत्वावर वर्ग-1 पदासाठी अर्ज सादर केलेला होता. सदर नोकरीसाठी शहीद गणपत मडावी यांच्या कुटंुबियांची सुमारे 2 कोटी 16 लाख रुपयांची फसवणूक करणाया आरोपीस गडचिरोली पोलीसांनी पुणे ग्रामीण पोलीसांच्या मदतीने पोस्टे राजगड, जि. पुणे हद्दीतून ताब्यात घेतले आहे .

 

सन 2022 साली सागर मडावी हा पुणे येथे स्पर्धा परिक्षेची तयारी करीत असताना यादरम्यान त्याची ओळख आरोपी ज्ञाने·ार शिवाजी वरे, वय 30 वर्षे, रा. वरोडी खुर्द, ता. भोर, जि. पुणे नामक व्यक्तीसोबत झाली. यानंतर ज्ञाने·ार वरे यास सागर याच्या अनुकंपा तत्वावरील नोकरीच्या प्रक्रियेबाबत माहिती मिळाली असता ज्ञाने·ार याने सागर यास त्याची मंत्रालयात ओळख असून त्यास अनुकंपा तत्वावरील उप-जिल्हाधिकारी (वर्ग-1) पदाच्या नियुक्तीबाबत मदत करेल असे फसवे आश्वासन दिले. त्यानंतर मंत्रालयातील अधिकायांना पैसे देण्याच्या नावाने ज्ञाने·ार वरे याने इतर चार आरोपींच्या मदतीने सागर व त्याची आई मीना गणपत मडावी यांची फसवणूक करुन वेळोवेळी रोख स्वरुपात, फोन पे वरुन तसेच सागर याच्या बँक खात्याच्या एटीएम मधून एकूण 2,16,79,100/- रुपये (अक्षरी – दोन कोटी सोळा लाख एकोनएैंशी हजार शंभर रुपये फक्त) फसवणूक करुन व खोटे आ·ाासन देऊन उकळले होते. यावरुन दिनांक 20 एप्रिल 2026 रोजीचे पहाटे पोस्टे गडचिरोली येथे सागर मडावी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन अप क्र. 469/2026 कलम 318 (4), 3 (5) भान्यासं अन्वये आरोपी ज्ञाने·ार शिवाजी वरे व त्याचे 04 सहकारी अशा पाच इसमांविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्राच्या अनुषंगाने मा. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने तपासाची चक्रे फिरवून आरोपीच्या ठाव ठिकाणाची माहिती काढली व पोलीस पथकास तातडीने पुणे येथे रवाना करण्यात आले. स्थानिक गुन्हे शाखा गडचिरोलीचे सपोनि. समाधान दौड व पोस्टे गडचिरोली येथील सपोनि. विजय मुसनवार यांच्या नेतृत्वाखाली साक्षीदारांच्या व तांत्रीक पुराव्यांच्या मदतीने व आरोपी ज्ञाने·ार शिवाजी वरे यास दिनांक 20/04/2026 रोजी संध्याकाळी पोस्टे राजगड, जि. पुणे येथुन ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. आरोपी नामे ज्ञाने·ार शिवाजी वरे यास मा. न्यायालयासमक्ष हजर केले असता मा. न्यायालयाने त्यास 04 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. यासोबतच इतर 04 फरार आरोपीतांचा शोध घेणे सुरु असून पुढील तपास सपोनि. विजय मुसनवार पोस्टे गडचिरोली हे करीत आहेत.

 

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री. नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक अहे री श्री. कार्तिक मधीरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. गोकुल राज जी., सहा. पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री. अनिकेत हिरडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि. समाधान दौड, पोस्टे गडचिरोलीचे सपोनि. विजय मुसनवार व अंमलदार यांनी पार पाडली आहे.

Don`t copy text!