*लातूर जिल्ह्यात उष्माघाताचा कहर अवघ्या नऊ महिन्याच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू*
लातूर जिल्हा प्रतिनिधी
लातूर जिल्ह्यातील तापमान सध्या 42अंशावर पोहोचले असून उन्हाने सर्वत्र थैमान घातले आहे.नुकताच लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील गोंद्री येथे नऊ महिन्याची चिमुकली सिया गोरे हिचा उष्माघाताने मृत्यू झाला.आईसोबत माहेरी आलेल्या सियाला पत्र्याच्या घरातील प्रचंड उकाडा सहन झाला नाही.पाळण्यात झोपलेल्या त्या चिमुकलीला उकाडा सहन झाला नाही.हालचाल कमी झाल्याचे लक्षात येताच तिला रुग्णालयात नेण्यात आले.पण उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
याआधीही औराद शहाजानी एका साठ वर्षीय वृद्धाचा उष्माघाताने मृत्यू झाला होता.अवघ्या काही दिवसात दोन मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.







