*अपघातग्रस्त दुर्गम कुटुंबाच्या पाठीशी माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव महाराज; आर्थिक मदत व शिक्षणासाठी दिला आधार.!*
*सिरोंचा:-* तालुका दौऱ्यावर असताना टेकडा येथील *महेश मयसय्या दुर्गम* यांच्या अपघाती निधनाची दुर्दैवी माहिती अहेरी इस्टेटचे राजे तथा माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव महाराज यांना मिळताच त्यांनी तात्काळ दुर्गम कुटुंबाचे घर गाठत सांत्वनपर भेट दिली.
यावेळी राजे साहेबांनी कुटुंबातील सदस्यांशी आपुलकीने संवाद साधत त्यांच्या दुःखात सहभागी होत मानसिक आधार दिला.या कठीण प्रसंगात कुटुंब एकटे नाही,असा दिलासा देत त्यांनी आर्थिक मदतीचा हात पुढे केला.
यासोबतच,दुर्गम कुटुंबातील मुलांच्या उच्च शिक्षणाची सहकार्य आपण करू ,असे आश्वासन देत त्यांच्या भविष्यासाठी भक्कम आधार निर्माण करण्याचा विश्वास राजे साहेब यांनी व्यक्त केला.
या संवेदनशील व मानवतावादी कृतीमुळे परिसरात राजे साहेबांविषयी आदराची भावना अधिक दृढ झाली आहे.
यावेळी युवा नेते कुमार अवधेशराव बाबा आत्राम.कुटूंबातील सदस्य गण आणि स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते.!







