Home Breaking News गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने उपपोस्टे बामणी येथे आरोग्य शिबिराचे करण्यात आले आयोजन

गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने उपपोस्टे बामणी येथे आरोग्य शिबिराचे करण्यात आले आयोजन

7

 

गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने उपपोस्टे बामणी येथे आरोग्य शिबिराचे करण्यात आले आयोजन

 

. या अभिनव उपक्रमादरम्यान उपपोस्टे बामणी हद्दीतील एकूण 170 नागरिकांची तज्ञ वैद्यकीय पथकाकडून तपासणी

. गडचिरोली पोलीस दल व शालीनीताई मेघे रुग्णालय, नागपुर यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आला उपक्रम

 

गडचिरोली पोलीस दलाकडून जिल्ह्रातील नागरिकांसाठी वेळोवेळी विविध कल्याणकारी उपक्रम राबविले जात असतात. जिल्ह्रामधील अतिदुर्गम भागातील नागरिकांपर्यंत देखील आरोग्य सेवा पोहचविण्याच्या उद्देशाने गडचिरोली पोलीस दलाकडून विविध आरोग्य मेळावे आयोजित केले जात असतात. याच उपक्रमांचा एक भाग म्हणून गडचिरोली पोलीस दल व शालीनीताई मेघे रुग्णालय, नागपुर यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक 22 मे 2026 रोजी उपपोस्टे बामणी येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

 

अतिदुर्गम भागातील नागरिकांमध्ये आरोग्य सुविधांविषयी जनजागृती करुन नागरिकांना विविध आरोग्य तपासणी आणि औषधोपचार मिळवून देण्याच्या उद्देशाने पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री. एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली सदर आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये शालीनीताई मेघे रुग्णालय नागपूरचे वैद्यकीय अधिकारी डॉ. भाऊराव नाखले (मेडीसीन प्रोफेसर), डॉ. रितिक राज दास, डॉ. रुद्रप्रसाद कोरवी, (कम्युनिटी मेडिसीन), व राहुल कुमरे मेडीकल वर्कर यांच्या नेतृत्वात नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात येऊन यांनी नागरिकांच्या आरोग्य समस्यांविषयी तपासणी केली.

 

सदर तपासणी शिबिरादरम्यान हद्दीतील सुमारे 170 नागरिकांची विविध आजारांबाबत तपासणी करून आवश्यकतेनूसार नागरिकांना मोफत औषधे उपलब्ध करुन देण्यात आली तसेच विविध आजारांविषयी व पोषण समस्यांविषयी मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी एकूण 18 नागरिकांना पुढील उपचारासाठी शालीनीताई मेघे रुग्णालय, नागपूर येथे शिफारस केलेली आहे. गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने सन 2021 पासून आजपावेतो एकूण 200 आरोग्य मेळाव्यांच्या माध्यमातून जवळ-जवळ एकूण 42,500 पेक्षा अधिक नागरिकांची आरोग्य तपासणी केलेली आहे. तसेच एकूण 05 रक्तदान शिबिरांच्या माध्यमातून एकूण 4,361 युनिट रक्ताचे संकलन करण्यात आले आहे. यासोबतच ऑपरेशन रोशनीच्या माध्यमातून एकूण 9,971 पेक्षा अधिक नागरिकांची नेत्र तपासणी करुन एकूण 1,412 नागरिकांची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आलेली आहे.

 

सदर आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री. एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. कार्तिक मधिरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. गोकुल राज जी. तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी सिरोंचा श्री. संदेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली उपपोस्टे बामणीचे सपोनि. प्रमोद कुरसुंगे, पोउपनि. आलोक ठाकुर व पोलीस अंमलदार यांनी यशस्वीरित्या पार पाडले.

Don`t copy text!