Home Breaking News गडचिरोली पोलीसांनी केला अवैध दारु व चारचाकी वाहनासह एकूण 14,87,200/- रुपयांचा मुद्देमाल...

गडचिरोली पोलीसांनी केला अवैध दारु व चारचाकी वाहनासह एकूण 14,87,200/- रुपयांचा मुद्देमाल जप्त

7

 

गडचिरोली पोलीसांनी केला अवैध दारु व चारचाकी वाहनासह एकूण 14,87,200/- रुपयांचा मुद्देमाल जप्त

 

. बनावट नंबर प्लेट वाहनाला लाऊन करीत होते अवैध वाहतूक व विक्री

 

गडचिरोली जिल्ह्रात दारुबंदी असतांना अवैधरीत्या छुप्या रीतीने दारु विक्री व वाहतुक करण्याचा प्रयत्न केला जात असतो. त्याविरुध्द पोलीस अधीक्षक, गडचिरोली श्री. एम. रमेश यांचे अवैध दारु विक्री करणा­यांवर प्रभावीपणे कायदेशिर कार्यवाही करण्याचे आदेश दिलेले आहेत. यावरुन काल दिनांक 21/05/2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखा, गडचिरोली व पोलीस स्टेशन, अहेरी येथील पोलीस पथकाने सापळा रचून अवैध दारूची वाहतुक व विक्री करणा­या आरोपीविरुध्द कारवाई केलेली आहे.

 

सविस्तर वृत असे आहे की, काल दिनांक 21/05/2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखा येथील अधिकारी व अंमलदार यांना गोपनिय बातमिदाराकडून माहिती मिळाली की, मौजा आलापल्ली येथील कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग आलापल्ली येथील कार्यालयासमोर एक अज्ञात इसम याने चारचाकी वाहन क्र. एम एच 12 एस एक्स 6981 वाहनाने अवैध देशी व विदेशी दारुची वाहतूक करुन विक्री करण्याकरीता उभी केलेली आहे. यावरून स्थानिक गुन्हे शाखा गडचिरोली व पोलीस स्टेशन, अहेरी येथील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने दोन पंचासह आलापल्ली येथील कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग आलापल्ली येथील कार्यलयासमोर जाऊन बघितले असता, सदर ठिकाणावर एक काळसर तपकीरी रंगाची बोलेरो कॅम्पर चारचाकी वाहन क्र. एम एच 12 एस एक्स 6981 उभी असल्याचे दिसून आले.

 

यानंतर पोलीस पथकाने सदर वाहनाची पंचासमक्ष पाहणी केली असता, सदर चारचाकी वाहनामध्ये 1) 500 एमएल क्षमतेचे हायवड्र्स 5000 कंपनीचे बियर टीन कॅनचे 46 खरड¬ाचे बॉक्स, प्रति बॉक्स 24 नग बिअर कॅन असे एकूण 1104 बिअर कॅन, अवैध विक्री किंमत अंदाजे रु. 300/- रु. प्रमाणे एकूण 3,31,200/- रु. 2) 90 एम एल क्षमतेचे रॉकेट देशी दारु संत्रा कंपनीचे 22 प्लास्टीकच्या पिशवी प्रति पिशवीमध्ये 100 नग निपा असे एकूण 2200 निपा, प्रति निप अवैध विक्री किंमत अंदाजे 80/- रु. प्रमाणे एकूण किंमत 1,76,000/- रुपये, 3) 2000 एमएल क्षमतेचे रॉयल स्टॅग डिलक्स विस्की कंपनीचे बॅरेलने भरलेले 20 प्लास्टीकच्या पिशवी, प्रति पिशवीमध्ये 06 नग बॅरेल असे एकूण 120 बॅरेल, प्रति बॅरेल अवैध विक्री किंमत अंदाजे 4000/- रु. प्रमाणे एकूण किंमत 4,80,000/- रुपये व 4) देशी व विदेशी दारु वाहतूक करीता वापरण्यात आलेली एक काळसर तपकिरी रंगाची बोलेरो कॅम्पर चारचाकी वाहन क्र. एम एच 12 एस एक्स 6981 जुनी वापरती किंमत अंदाजे 5,00,000/- असा एकूण 14,87,200/- (अक्षरी चौदा लाख सत्याएैंशी हजार दोनशे रुपये) रुपयांचा मुद्देमाल घटनास्थळावरुन जप्त करण्यात आला. संबंधीत घटनेच्या अनुषंगाने पोस्टे अहेरी येथे दिलेल्या तक्रारीवरुन कलम 65 (अ) म.दा.का. अन्वये अज्ञात आरोपी याचे विरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर गुन्ह्रातील आरोपीचा शोध घेणे सुरु असून, गुन्ह्राचा पुढील तपास पोस्टे अहेरीचे प्रभारी अधिकारी पोनि. हर्षल अेकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

 

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक, गडचिरोली श्री. एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. कार्तिक मधिरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. गोकुल राज जी., यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा गडचिरोलीचे प्रभारी अधिकारी पोनि. श्री. अरुण फेगडे तसेच पोस्टे अहेरीचे प्रभारी अधिकारी पोनि. हर्षल अेकरे यांच्या नेतृत्वात स्थागुशाचे सपोनि. भगतसिंग दुलत, पोअं/शिवप्रसाद करमे, रोहित गोंगले, चापोअं/संदिप भेंडारे, पोस्टे अहेरीचे पोहवा/राकेश करमे, नापोअं/ज्ञानेश्वर निलावार, पोअं/नितेश दाने व चापोअं/अनंत सातपुते यांनी पार पाडली.

Don`t copy text!