Home Breaking News *पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे २६ मे रोजी चामोर्शीत आयोजन*

*पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे २६ मे रोजी चामोर्शीत आयोजन*

8

*पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे २६ मे रोजी चामोर्शीत आयोजन*

 

*४३४ रिक्त पदांसाठी नामांकित कंपन्यांची उपस्थिती; दहावीपासून पदव्युत्तर उमेदवारांना रोजगाराची संधी*

 

गडचिरोली, (जिमाका) दि.22 : जिल्ह्यातील बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी तसेच उद्योगांना कुशल मनुष्यबळ उपलब्ध व्हावे या उद्देशाने जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गडचिरोली यांच्या वतीने मंगळवार, दिनांक 26 मे 2026 रोजी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा रोजगार मेळावा सकाळी 10 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत शिवाजी हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, नवीन बस स्टँडजवळ, गडचिरोली रोड, चामोर्शी येथे आयोजित करण्यात आला आहे.

 

सदर रोजगार मेळाव्यामध्ये विविध नामांकित खाजगी कंपन्या सहभागी होणार असून विविध क्षेत्रातील एकूण 10 पदांसाठी 434 रिक्त जागा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. या मेळाव्यात दहावी, बारावी उत्तीर्ण किंवा अनुत्तीर्ण, आयटीआय, डिप्लोमा, पदवीधर तसेच पदव्युत्तर शिक्षण घेतलेले उमेदवार सहभागी होऊ शकणार आहेत. उमेदवारांचे वय किमान 18 ते कमाल 50 वर्षांपर्यंत असणे अपेक्षित आहे.

 

मेळाव्यामध्ये निवड झालेल्या उमेदवारांना संबंधित पदांनुसार मासिक वेतन किमान 16 हजार रुपयांपासून ते कमाल 50 हजार रुपयांपर्यंत देण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बेरोजगार युवक-युवतींसाठी हा रोजगार मेळावा मोठी संधी ठरणार आहे.

 

जिल्ह्यातील सर्व इच्छुक व पात्र उमेदवारांनी आपल्या बायोडेटा / रिज्युमेसह शैक्षणिक व आवश्यक कागदपत्रांच्या प्रती घेऊन प्रत्यक्ष रोजगार मेळाव्यात सहभागी व्हावे व उपलब्ध रोजगार संधींचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी इच्छुक उमेदवारांनी gadchirolirojgar@gmail.com या ई-मेलवर अथवा 7843048249 व 8788257016 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, यांनी केले आहे.

Don`t copy text!