Home Breaking News *गडचिरोली जिल्ह्यात ११७ ‘आपले सरकार सेवा केंद्र’ स्थापन होणार*

*गडचिरोली जिल्ह्यात ११७ ‘आपले सरकार सेवा केंद्र’ स्थापन होणार*

10

*गडचिरोली जिल्ह्यात ११७ ‘आपले सरकार सेवा केंद्र’ स्थापन होणार*

 

*केंद्र चालक निवडीसाठी अर्ज आमंत्रित*

 

गडचिरोली, दि. १५ : नागरिकांना शासकीय सेवा स्थानिक पातळीवर सुलभपणे उपलब्ध करून देण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यात ११७ ‘आपले सरकार सेवा केंद्र’ स्थापन करण्यात येणार आहेत. यामध्ये ११५ ग्रामपंचायत स्तरावरील व २ नगर परिषद/नगर पंचायत स्तरावरील केंद्रांचा समावेश आहे.

 

केंद्र चालक निवडीसाठी पात्र उमेदवारांकडून १६ जून ते ३० जून २०२६ या कालावधीत अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्जाचा नमुना, केंद्रांची यादी व सविस्तर माहिती www.gadchiroli.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

 

नागरिकांना शासनाच्या सेवा अधिक सुलभ, जलद आणि पारदर्शक पद्धतीने मिळाव्यात, या उद्देशाने ही केंद्रे सुरू करण्यात येत आहेत. पात्र व इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या मुदतीत अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले आहे.

Don`t copy text!