रुग्णवाहिकेचे ना.गडकरीजींच्या हस्ते लोकार्पण
नागपूर:- विदर्भातील सात सामाजिक संस्थांना सुसज्ज रुग्णवाहिकेचे लोकार्पण ना. नितीनजी गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. कोरोणा काळात मदत करण्याच्या दृष्टीने ना.गडकरी यांच्या घरी पार्किंगमध्ये दि.१ मे ला.छोठेखानी समारंभ गणमान्य मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
विदर्भात रुग्ण सेवेचे काम करणार्या विविध प्रतीनिधीकडे सदर रुग्णवाहिकेच्या किल्ल्या सोपविण्यात आल्या. यापैकी एक रुग्णवाहिका भंडारा जिल्हयातील पवनी स्थित समर्पण बहुउद्देशीय सह.संस्था पवनीला मिळाली. स्व. संजय चव्हाण यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ रुग्णवाहिका देण्याचे खा.सुनीलजी मेंढे यांनी एका समारंभात कबुल केले होते. त्याची पुर्तता आज झाली. रुग्णवाहिकेची किल्ली केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीनजी गडकरी यांनी सोपविली. त्याप्रसंगी नागपुरचे महानगर पालिका विभागीय आयुक्त राधाकृष्ण बी, ना.नितीनजी गडकरी, खा.सुनीलजी मेंढे, समर्पण चे अजय चव्हाण, मोहन सुरकर, किशोर पंचभाई, राजेंद्र फुलबांधे उपस्थित होते. केंद्रीय रस्ते विकास महामंडळाच्या सामाजिक निधीतून ह्या रुग्णवाहिका देण्यात आल्या.
सदर रुग्णवाहिकेमध्ये व्हेंटिलेटर,बेड,आक्सिजन असे आधुनिक तंत्रज्ञान आहे. या रुग्णवाहिकेचे नियोजन भाजप चे तालुका अध्यक्ष मोहन सुरकर यांच्या कडे राहीलं. समर्पणचे अजय चव्हाण यांनी वचन पुर्ततेचा आंनद व्यक्त केला. ना.नितिनजी गडकरी व खा.सुनीलजी मेंढे यांचे आभार मानले.