ऑक्सिजन वायू नलिकांच्या तपासणीसाठी
मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याबाबत समिती गठीत.
नागपूर दि.5:- शासकीय व खासगी रूग्णालयातील ऑक्सिजन वायू नलिकांची व प्रणालींची तपासणी करण्याकरीता मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याबाबत समिती गठीत करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे हे या समितीचे अध्यक्ष असतील. सहसंचालक तंत्रशिक्षण विभाग हे या समितीचे नोडल अधिकारी असतील .तर सदस्यांमध्ये प्राचार्य, शासकीय अभियांत्रिकी महाविदयालय यांच्यासह प्राचार्य, शासकीय तंत्रनिकेतन आणि प्राचार्य, शासकीय औदयोगिक प्रशिक्षण संस्था हे तीन सदस्य असणार आहेत.
समिती गठीत करण्याचे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निर्गमीत करण्यात आले आहेत. 148 रुग्णालयांतील ऑक्सिजन वायू नलिकांची व प्रणालींची तपासणी 28 पथके तयार करण्यात आली आहेत.