अपघातात एकाचा मृत्यू दुसरा गंभीर जखमी

199

रुई विद्या नगर जवळील घटना

ब्रह्मपुरी: नागपुर वरून गडचिरोली मार्गे भाजीपाला घेऊन जाणाऱ्या एम एच ३३ टी २४८१ क्रमांकांच्या महिंद्रा मिनीमॅक्सने ब्रह्मपुरी आरमोरी राज्य महामार्गावरील रुई विद्या नगर गावाजवळ दोन इसमांना चिरडल्याने ललित चौधरी वय (४६) निलज यांचा जागीच मृत्यू तर सदाशिव प्रधान वय (६८) रुई गंभीर रित्या जखमी झाल्याची घटना दिनांक १० मे रोजी सकाळी ६:३० वाजताच्या दरम्यान घडली
प्राप्त माहिती अशी की रुई येथील शेतकरी सदाशिव प्रधान यांची शेती विद्यानगर लागून असल्याने नेहमीप्रमाणे शेतीची पाहणी करण्यासाठी शेतीवर जात होते निलज येथील ललित चौधरी आंबे विकण्यासाठी ब्रह्मपुरीला जात होते मात्र नागपुर वरून गडचिरोली कडे भाजीपाला घेऊन जात असताना भरधाव वेगात येणाऱ्या एम एच ३३टी२४८१महिंद्रा गाडी चालविणाऱ्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने या दोघांना चिरडले त्यात निलज येथील ललित चौधरी यांचा जागीच मृत्यू झाला असून रुई येथील सदाशिव प्रधानहे गंभीररीत्या जखमी आहेत त्यांना गडचिरोली येथील जिल्हा ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले आहे मात्र वाहन चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून अधिक तपास ब्रह्मपुरी पोलीस करीत आहेत