युवा संकल्प संस्थेने मृतक मुलींच्या कुटुंबियांना दिली सांत्वन भेट

119

शासनाकडून मदत मिळवून देण्याचे दिले आश्वासन

गडचिरोली:- जिल्ह्यात यूवा संकल्प संस्था हि नेहमी समाज कार्य करीत असून विदर्भात कोठेही समाज कार्य करण्याकरिता पूढे जात असून कोविड लस घेण्याकरीता येणारया गावातील नागरीकाना उन्हात ऊभे राहू नये म्हणून चामोर्शी तालूकयातील लसीकरण केंद्रात नेट बांधून सावली करून दिली असे सामाजिक उपक्रम राबवित असताना चामोर्शी तालूकयातील वाघोली येथील तिन अल्पवयीन मुली वैनगंगा नदिचया पलीकडे आंबे तोडायला डोंगयावर बसून जात असताना खोल पाण्यात डोंगा पलटून तिन मूलीचा दूरदैवी मृत्यू दिनांक अठरा. मे. रोजी झाला याची माहिती मिळताच
या तीन मुलीच्या कुटुंबातील व्यक्तींना भेट देऊन त्यांचे सांत्वन केले.व आपली युवा संकल्प संस्था शासनाकडून मदत या मृत कुटुंबातल्या व्यकतीना मिळाली पाहिजे साठी याकरिता प्रयत्न करणार असल्याचेआश्वासन यूवा संकल्प संस्थेच्या पदाधिकारयानी दिले.
यावेळी युवा संकल्प संस्था विदर्भ महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष मा.राहुल वैरागडे, सहसचिव प्रशांत पालपल्लीवार,सदस्य उमेश दिकोंडावार, प्रशांत कुसराम, मनोज भाऊ पोरटे, अतुल पोरटे, डंबाजी पोरटे,भावराव पोरटे, जिगर नायबनकर, सुरज पोरटे, अनिकेत नरुले, संदीप दयलकर, चुरीराम ठाकूर,व वाघोली येथील पोलीस पाटील गेडाम व गावकरी उपस्थित होते.